शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:11 IST

पुणे : राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला ...

पुणे : राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तर अंदमान समुद्र व त्याच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र २२ मेपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या बहुतांश भागात आणि कोकण, गोवा व विदर्भाच्या तुरळक भागात घट झाली आहे. राज्यात आज सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपूरी येथे ४०.५ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १७.६ अंश सेल्सिअस होते. बुधवारी दिवसभरात पुणे ७.८, लोहगाव ७.४़ कोल्हापूर ०.७, नाशिक १, मुंबई १३, सातांक्रूझ ०.५, अलिबाग २३, रत्नागिरी ०.२, डहाणू ५, अमरावती ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

उत्तर अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राबरोबर २१ मेदरम्यान मॉन्सूनचे वारे दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

पश्चिम बंगाल, ओडिशाला धोका

अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळ शमले नसतानाही उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचे बंगालच्या उपसागरात पुढील ७२ तासात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते २६ मेच्या सायंकाळी पश्चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशासह लगतच्या आसाम, मेघालय भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. यावेळी वार्‍याचा वेग ताशी ४० ते ६० किमी असण्याची शक्यता आहे.