शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

चासकमानचे पाणी ‘ताप’तेय!

By admin | Updated: April 10, 2017 02:20 IST

चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा

चासकमान : चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून खेडसह शिरूर तालुक्याला पाणी सोडल्याने चासकमान धरणाचा डावा कालवा तुडुंब भरून वाहत आहे. यामुळे चासकमान धरणाच्या पाणीपातळी घटत आहे. धरणामध्ये ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. शिल्लक पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी धरणाअंतर्गतच्या गावांतील नागरिकांनी केली आहे. सध्या डेहेणे, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी आदी गावाअंतर्गत असलेला पाणीसाठा झपाट्याने कमी झाल्याने अंतर्गत गावांना एप्रिल महिन्यातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. हे आवर्तन सोडल्यामुळे धरणाखालील गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. परंतु धरणाअंतर्गत असलेल्या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. (वार्ताहर)डेहेणे, खरोशी, वाडा, तिफनवाडी, दरकवाडी, बुरसेवाडी आदी सह गावांच्या जमिनी धरणामध्ये गेल्याने या गावांना पाणीसमस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे. गावांतील महिलांना मैलोन्मैल फेब्रुवारी महिन्यापासून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे. यावर्षी १८ टक्के जास्तधरणामध्ये सद्या स्थितीत ३४.१७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच तारखेला १६.८१ टक्के इतका होता. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यावर्षी १८ टक्के जादा पाणीसाठा शिल्लक आहे.पाणलोटमध्ये बंधारे बांधाधरणाअंतर्गत गावांमध्ये प्रशासनाने छोटे-मोठे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे अधिक प्रमाणात बांधावे. यामुळे पाणी अधिक प्रमाणात अडून राहून पाणी साठवण क्षमता वाढेल, अशी मागणी नागरिक करत आहे.४00 क्युसेक्सने पाणी पळविले; जातेगावच्या माजी सरपंचावर गुन्हाकेंंदूर : चासकमान कालव्यातून कारेगाव धानोरे शाखा कालव्यास सोडण्यात आलेले पाणी रात्रीच्या सुमारास शासकीय नियम व आदेशाचे उल्लंघन करून ४०० क्युसेक्स पाणी चोरी केल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : चासकमान कालव्यामधून कारेगाव धानोरे या विभागासाठी पाणी सोडण्यात आले आहे. करंदी गावच्या हद्दीमध्ये पाणी सुरू असताना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जातेगाव खुर्दचे माजी सरपंच समाधान डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलूप तोडून स्वत:च्या व सहकाऱ्यांच्या शेताला पाणी मिळावे या उद्देशाने ४०० क्युसेक्स पाणी चोरून नेले. याबाबत शिक्रापूर येथील चासकमान शाखा एकचे अधिकारी शंकर बसप्पा संतीकर यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. माजी सरपंच समाधान डोके व साथीदारांवर कलम ३७९, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश कांबळे करत आहेत. चासकमान धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपात सोडण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. या परिसरात चासकमानच्या धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते; मात्र पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर, या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही दुष्काळी परिस्थिती सहन करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. (वार्ताहर)चासकमानचे पाणी सोडून सात दिवस झाले; मात्र जातेगाव खुर्दपर्यंत २०० क्युसेक्सनेच पाणी मिळत आहे. ४०० क्युसेक्स पाणीचोरीचा आरोप माझ्यावर व सहकार्यांवर करण्यात आलेला खोटा असून संबंधित अधिकारी शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. - समाधान डोके, माजी सरपंच, जातेगाव खुर्द शासनाच्या निर्णयामुळे मागील वर्षी याच भागातील उसाचे खूप मोठे नुकसान या भागातील शेतकऱ्यांना सहन करावे लागले होते. यंदाही असाच प्रकार पुन्हा होत आहे. जमीन महसूल कायद्यातील कलम ७० /२ नुसार पाणी प्रथम याच भागात देणे अपेक्षित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप येथील शेतकरी आक्रमक झाले असून पाण्यासाठी मोठा लढा उभा करण्याच्या तयारीत आहेत.