शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आजपासून चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून पुढील सहा दिवस हा उत्सव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आजपासून चंपाषष्टी उत्सवाला सुरुवात झाली असून पुढील सहा दिवस हा उत्सव जेजुरीत षडरात्रोत्सव साजरा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा दिवसांचा हा उत्सव धार्मिक कार्यक्रमातच साधेपणाने साजरा केला जाणार आहे.

पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धरण करून चंपाषष्टीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी पर्यन्त ६ दिवस चालले होते. तेव्हापासून या सहा दिवसात खंडोबा गडावर विजयोस्त्सव साजरा केला जातो. चंपाषष्ठी हा दिवस विजय दिन म्हणून ही साजरा केला जातो. उत्सवाचा प्रारंभ करताना आज पहाटेच मुख्य मंदीरात पाकाळणी करण्यात आली. मार्तंड भैरव मूर्तीला दही दूध व तेलाने स्नान घालण्यात आले. सभोवताली गाभार्‍यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. महापूजा उरकल्यानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना मिरवणुकीने मंदीर प्रदक्षिणा घालण्यात आली. प्रदक्षिनेंनंतर बालदारीत उत्सव मूर्तींना आणण्यात आले. मंगलमय वातावरणात तेथे उत्सवमूर्तीची स्थापना करून समोरच दिल्लीहून आलेले भीष्माचार्यजी महाराज यांच्या हस्ते घट बसवण्यात आले.

यावेळी देवांची महाआरती, भंडार खोबऱ्याची उधळण तसेच पुष्पवृष्टी ही करण्यात आली. देवाचे मानकरी, पुजारी सेवक वर्गाकडून उत्सवमूर्तींना सुवर्ण व चांदीचे दागीने घालण्यात आले. मार्तंड देवसंस्थान, जयमल्हार चंपाषष्टी प्रतीष्ठानच्यावतीने संपूर्ण गडकोटाला विध्युत रोषणाई करण्यात आली आहे. गाभाऱ्यात व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली आहे. यावेळी मार्तंड देव संस्थान चे विश्वस्त राजकुमार लोढा, पंकज निकुडे, संदीप जगताप, शिवराज झगडे, जेजुरी पोलीस स्टेशनचे पी आय सुनील महाडिक उपस्थित होते.

उत्सवाचे नियोजन देवाचे पुजारी गणेश आगलावे, अविनाश सातभाई, अनिल बारभाई, हनुमंत लांगी, चेतन सातभाई, प्रशांत सातभाई यांनी केले आहे

फोटो मेल केला आहे जेजुरीत मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली.

फोटो :