शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चाळकवाडी टोल तूर्त बंद होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:45 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला

नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्गावरील वडगाव आनंद येथील बायपासचे काम करण्यासाठी आलेल्या ठेकेदाराला स्थानिक लोकप्रतिनिधीने दमबाजी केल्यामुळे ठेकेदार काम सोडून निघून गेला, अशी ग्वाही टोल कंपनीच्या प्रतिनिधीने जिल्हाधिकारी यांच्यासमोर दिली आहे़ मात्र तो लोकप्रतिनिधी कोण? हे सांगण्यास भीतीपोटी असमर्थता व्यक्त केली़ दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करू नये, अशी मागणी केली असता जिल्हाधिकारी यांनी तूर्त टोलनाका बंद ठेवण्यास अनुकूलता दर्शविली.़ टोलसंदर्भात येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे बैठक होणार आहे, अशी माहिती प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली़टोल बंद आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आयोजिलेल्या बैठकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, युवानेते अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, ‘विघ्नहर’चे संचालक संतोषनाना खैरे, भीमाजीशेठ गडगे, गुलाब नेहरकर, अनंतराव चौगुले, धनंजय काळे, सूरज वाजगे, टोलनाक्याचे प्रतिनिधी दाऊद खान, बाधित शेतकरी, आळे गावचे प्रतिनिधी, विविध मान्यवर उपस्थित होते़या बैठकीत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भूसंपादनाच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली़ बाधितांना पारदर्र्शक पद्धतीने व जलदगतीने पैसे मिळणे अपेक्षित होते़ शेतकऱ्यांचे पैसे कोर्टात पाठविले ही चूक आहे़ ती दुरुस्त करून शेतकºयांना लवकरात लवकर पैसे अदा करण्यात येतील़ तसेच तालुक्याच्या ठिकाणी विभागीय कार्यालय सुरू करून तेथे बाधित शेतकºयांचे प्रश्न सोडविले जातील़ ज्यांचे हिअरिंग आहे लवकर घेऊन निर्णय दिला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली़बायपासचे काम पूर्ण का होत नाही, अशी विचारणा केली असता, तसेच अतुल बेनके यांनी भूसंपादनाचे लेख जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यानंतर त्यांनी टोलचालकांकडे काम अपूर्ण का? याबाबत विचारणा केली. कंपनीचे प्रतिनिधी खान म्हणाले, की इन्व्हेस्टमेंट खूपझाली आहे, काम करण्यास पैसे शिल्लक नाहीत़यावर जिल्हाधिकारी यांनी पैशांची जबाबदारी तुमची आहे, काम पूर्ण झालेच पाहिजे, अशी सूचना केली़ सबठेकेदार पळून का गेला? याबाबत खान यांनी वडगाव आनंद येथील बायपासचे काम सुरू करताना स्थानिक लोकप्रतिनिधीने धमकाविल्याने तो ठेकेदार निघून गेला, अशी माहिती दिली़ यावर उपस्थितांनी लोकप्रतिनिधींच्या नावाचा खुलासा करावा, अशी मागणी केली असता, खान यांनी नाव सांगण्यास भाग पाडू नका, अशी विनंती केल्याने जिल्हाधिकारी यांनी आपल्याला एकांतात नाव सांगावे, असे सांगून यावर पडदा पाडला़बायपासचे काम जलदगतीने करावे़ येत्या दि़ २० जुलै रोजी मुंबई येथे केंद्र सरकारचे प्रतिनिधी, ठेकेदार, कंपनीला फायनान्स पुरविणारे प्रतिनिधी, अतुल बेनके व इतर मान्यवर यांची बैठक घेण्यात येणार आहे़ यावेळी बेनके यांनी काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलनाका बंद करावा, अशी मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी टोलनाका तूर्त बंद ठेवण्याचे मान्य केले़ तसेच आळे येथील पिण्याच्या पाण्याची व्यथा समजावून घेऊन ती पाईपलाईन लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारीयांनी दिले़