शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

चाकणला २२ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 29, 2014 04:54 IST

‘सामुदायिक विवाहसोहळे ही काळाची गरज असून, अशा सोहळ्यांमध्ये सर्वसामान्यांचे विवाह होणे अपेक्षित आहे,

चाकण : ‘सामुदायिक विवाहसोहळे ही काळाची गरज असून, अशा सोहळ्यांमध्ये सर्वसामान्यांचे विवाह होणे अपेक्षित आहे, त्यासाठी गेल्या बावीस वर्षांपासून चाकण येथे सामुदायिक विवाहसोहळा ही चळवळ अखंडपणे राबविणारे या सोहळ्याचे प्रणेते सुरेश गोरे यांचा आदर्श घेण्याची गरज आहे,’ असे मत शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंगलदास बांदल यांनी येथे व्यक्त केले. मानव विकास कल्याण ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी चाकण यांच्यातर्फे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, विद्यमान सदस्य सुरेशभाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली येथील मार्केटयार्डच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी बांदल बोलत होते. या सोहळ्यात एकूण २२ जोडपी विवाहबद्ध झाली. या प्रसंगी भोसरीचे आमदार विलासराव लांडे, राजगुरुनगर बँकेच्या संचालिका हेमलता टाकळकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक विजया शिंदे, खेड पंचायत समितीच्या सदस्या अ‍ॅड. अमृता गुरव, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पांडुरंग गोरे, चक्रेश्वर पतसंस्थेचे माजी अध्यक्ष भगवान बिरदवडे, उद्योगपती बाळासाहेब जाधव, चाकण पतसंस्थेचे संचालक सुरेश कांडगे, उपाध्यक्ष प्रकाश भुजबळ, उद्योजक संजय पुरी, अशोक जाधव, धीरज केळकर, नितीन गोरे, दत्तात्रय गोरे, ऋषिकेश शेवकरी, निवृत्ती जाधव, अनिल धाडगे, विकास गोरे, रामदास जाधव आदींसह वºहाडी मंडळी, ग्रामस्थ, संयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी साखरपुडा, हळदी समारंभ आटोपल्यानंतर वाद्यवृंदांच्या गजरात नवरदेवांची संपूर्ण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. भव्य-दिव्य सजविलेल्या आकर्षक मंडपात या वेळी बावीस जोडपी विवाहबद्ध झाली. अगदी नियोजनबद्धपणे सोहळा पार पडल्याने या सोहळ्याचे प्रणेते सुरेशभाऊ गोरे यांचे या वेळी कौतुक करण्यात आले. आमदार लांडे यांनीही सुरेश गोरे यांचे कौतुक केले. बाळासाहेब गोरे, नितीन गोरे, विकास गोरे, दत्तात्रय गोरे यांनी स्वागत केले. विवाह सोहळ्याचे प्रणेते सुरेश गोरे यांनी प्रास्ताविक, तर सुदाम कराळे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजीराजे खराबी यांनी आभार मानले. (वार्ताहर)