शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

चाकण एसटी स्थानक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:59 IST

अडीच महिन्यांपासून समस्या : समाजकंटकांनी केली होती जाळपोळ

चाकण : मराठा मोर्चा आंदोलनातील जाळपोळ व हिंसाचाराला अडीच महिने पूर्ण झाले असून, तेव्हापासून चाकणचे एसटी बसस्थानक अंधारात आहे. बसस्थानकात सर्वत्र अस्वच्छता दिसून येत आहे.

बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने असून नसल्यासारखे झाले आहे. आंदोलनात बसस्थानकाचे संपूर्ण कार्यालय समाजकंटकांनी जाळून टाकले. त्यात कार्यालयातील विद्युत यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा व फर्निचर आगीत भस्मसात झाले. परिणामी, अडीच महिन्यांपासून कार्यालय बंद आहे.कार्यालय बंद पडल्याने वाहतूक नियंत्रक येत नाही. एक-दोन बस वगळता बाकीच्या सर्व बस स्थानकात येतच नाहीत. इतर बसही स्थानकात न येता महामार्गावरून तशाच पुढे जातात. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

बसस्थानकात झालेल्या जाळपोळीमुळे विद्युत यंत्रणा बंद पडली असून बसस्थानकात केवळ अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे प्रवाशांना सायंकाळनंतर बस स्थानकात बसणे भीतिदायक झाले आहे.

विद्युत यंत्रणा सुरू करून बस स्थानकाचे कार्यालय पूर्ववतसुरू करण्याची मागणी बस स्थानकातील सर्व व्यावसायिक यांच्यासह भाजपाचे कायदा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण झिंजुरके व जिल्हा युवा मोर्चाचेजिल्हा संपर्कप्रमुख संदेश जाधव यांनी केली आहे.

टॅग्स :Chakanचाकणelectricityवीज