शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By admin | Updated: November 17, 2016 02:21 IST

शाळा-कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो.

चाकण : शाळा-कॉलजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र, ज्या शाळेमध्ये, ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. सर्वांना एकदा भेटावे, एकमेकांशी हितगुज करावे, असे सर्वांना वाटते. मात्र, तीस वर्षांचा मोठा कालखंड लोटल्यानंतर, प्रत्येकजण आपापल्या नोकरी-धंद्यात व्यस्त असल्याने ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र, ते अशक्यही नसते. हे चाकणच्या शिवाजी विद्यालयातून १९८६ साली एसएससी उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. आणि तब्बल तीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला.ज्या शाळेत आपण लहानाचे मोठे झालो, ज्या मातीने आपल्याला घडवलं, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र दिले, त्या भूमीत पुन्हा एकदा त्याच सवंगड्यांसह एक डाव पुन्हा मांडण्याची संधी चालून आली ती माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने ... चाकणच्या शिवाजी विद्यालयामधून १९८५-८६ या शैक्षणिक वर्षात दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले १२० विद्यार्थी एक दोन नव्हे, तर चक्क तीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले. त्यात २१ विद्यार्थिनींचा सहभाग होता. प्रथमत: सर्वांचे स्वागत करून तीस वर्षांच्या कालावधीत जीवनाच्या प्रवासातून अर्ध्यावर सोडून गेलेल्या २० विद्यार्थ्यांना व देश सीमेवरील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या मेळाव्यातून माजी विद्यार्थी आज कुठे-काय करताहेत, याची माहिती शाळेच्या नव्या प्रशासनाला मिळाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन संजय गोरे, संदीप परदेशी, राजेश कांडगे, अतुल वाव्हळ, अनिल सोनवणे, अतुल वाव्हळ, नितीन रासकर, प्रवीण नायकवाडी, दिलीप शेवकरी, संजय जाधव, महानंदा गोरे, माधुरी पाबळकर या माजी विद्यार्थ्यांनी केले.(वार्ताहर)