शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चाकण औद्योगिक वसाहत भूसंपादन : वाढीव एफएसआय द्या! ग्रामस्थांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:31 IST

 लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी भूसंपादनाचा दर ठरविण्याची बैठक निष्फळ ठरल्यानंतर या गावातील सरपंच एकत्र आले आहेत. त्यांनी जमिनीच्या बदल्यात १५ टक्के परतावा मिळावा, त्या निवासी भूखंडावर बांधकामासाठी वाढीव एफएसआय मिळावा, त्यात ३३ टक्के बांधकाम व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी, म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होईल, अशा ...

 लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी भूसंपादनाचा दर ठरविण्याची बैठक निष्फळ ठरल्यानंतर या गावातील सरपंच एकत्र आले आहेत. त्यांनी जमिनीच्या बदल्यात १५ टक्के परतावा मिळावा, त्या निवासी भूखंडावर बांधकामासाठी वाढीव एफएसआय मिळावा, त्यात ३३ टक्के बांधकाम व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी, म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण होईल, अशा विविध मागण्या केल्या आहेत.औद्योगिक वसाहतीसाठी] मोठ्या प्रमाणात जमीन संपादन झाले. त्यामुळे हक्काचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन कायमचे गेले. उभारलेल्या कारखान्यात नोकºया आणि व्यवसाय मिळत नसल्याची खंतही या वेळी त्यांनी वक्त केली. पुणे जिल्हा परिषदेतील भाजपाचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वासुली (ता. खेड) येथे बैठकीचे आयोजन केले होते. यात १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ठराव करणार असल्याचे सरपंचांनी सांगितले. चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमध्ये वराळे, भांबोली, सावरदरी, खालुंब्रे, शिंदे व वासुली या गावांमधील जमीन संपादित करण्यात आली. त्यामुळे या गावातील नागरिकांचे हक्काचे उदरनिर्वाहाचे साधन कायमचे गेले. परंतु स्थानिकांना नोकऱ्या, कुठलाही व्यवसाय कारखानदारांनी दिले नाहीत.अनेक कंपन्यांनी त्यांचे जुनेच पुरवठादारांनाच प्राधान्य दिले. म्हणून प्रकल्पबाधित शेतकºयांना उदरनिर्वाहासाठी पुढील सवलती मिळाव्यात असे या बैठकीत ठरविण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, रामदास मेंगळे, इंदुबाई शेळके, बेबीताई बुट्टेपाटील, सुरेश पिंगळे-देशमुख, सागर आंद्रे, गणेश पवार, ग्रामपंचायत सदस्य काळूराम पिंजण, दत्तात्रय टेमगिरे, संजय रौंधळ, मालक पाचपुते, सुरेश बुट्टेपाटील यांच्यासह चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील विविध गावचे आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन उपसरपंच सुरेश पिंगळे-देशमुख यांनी केले तर आभार रामदास मेंगळे त्यानी मानले.शेतकऱ्यांच्या मागण्या एकत्र कुटुंबपद्धतीमुळे अनेक भाऊ एकत्र राहात होते, त्यामुळे प्रत्येकास निवासी परतावा मिळावा.निवासी भूखंडावर एक एफएसआयचे बांधकाम करता येते. त्यात वाढ करून दोन एफएसआय करावा व त्यातील ३३ टक्के बांधकाम व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी.ज्या शेतकºयांना १५ टक्के परतावा मिळणे बाकी आहे त्यांना तो मिळावा आणि त्यात ५० टक्के व्यावसायिक वापरास परवानगी मिळावी.निवासी भूखंडाला असणारी नऊ मीटर उंचीची अट रद्द करावी.