शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चाकणला ‘जमीनमुक्ती’साठी लढा!

By admin | Updated: December 7, 2015 00:17 IST

चाकणच्या ‘त्या’ सात गावांतील जमिनीवर विमानतळासाठी राखीव म्हणून शिक्के असताना पुन्हा याच जमिनीवर औद्योगिक वसाहत फेज ५ करीता आरक्षणाच्या नोटीसी काढण्यात

पुणे/ आंबेठाण : चाकणच्या ‘त्या’ सात गावांतील जमिनीवर विमानतळासाठी राखीव म्हणून शिक्के असताना पुन्हा याच जमिनीवर औद्योगिक वसाहत फेज ५ करीता आरक्षणाच्या नोटीसी काढण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनात उतरली असून खेडप्रमाणे येथील शिक्के काढण्यासाठी आंदोलन करणार आहेत. येथील आंबेठाण, गोनवडी, वाकी खुर्द, रोहकल आणि बिरदवडी आदी सात गावांतील तब्बल २००० हजार एकर बागायती जमीन भूसंपादनच्या नावाखाली अधिग्रहित करण्यासाठी २००२ पासून राखीव करण्यात आली आहे. आधी विमानतळाच्या नावाखाली शिक्के पडले. मात्र २००५ सालीच सदर जमीन विमानतळ प्राधिकरणाने फेटाळली. मात्र त्या जमिनीवरील शिक्के शासनाद्वारे काढले नाहीत. यामुळे सर्व शासकीय योजनांच्या लाभापासून येथील शेतकरी वंचित राहिला. स्वत:च्या हक्काच्या जमिनी असताना साधी विहीर खोदण्यास त्याला मनाई आहे.नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जया शेट्टी यांनी बोरदरा (ता. खेड) येथे शेतकऱ्यांची बैैठक घेतली. या वेळी जर या ठिकाणी बळजबरीचा वापर करून जमीन संपादनाचा प्रयत्न केला तर चोख उत्तर दिले जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटना या भागातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आह. एक इंचही जमीन जाऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता स्वाभिमानी संघटनेने चाकणच्या त्या सात गावांची ‘जमीनमुक्ती’ करण्याचा निर्धार केला आहे. संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे यांनी, खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभे केले जाईल, असे सांगितले. याकरिता लवकरच तिथे मोठा शेतकरी मेळावा आयोजित केला जाईल. (प्रतिनिधी)1खेड तालुक्यात एमआयडीच्या पाचव्या टप्प्यासाठी आंबेठाण, गोनवडी, वाकी खुर्द, रोहकल, आणि बिरदवडी या पाच गावामधील ७७८ हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. सध्या खेड तालुक्यात एमआयडीचे चार टप्पे झाले असून हे सर्व चाकण परिसराच्या पश्चिम आणि दक्षीणभागात झाले आहेत. नव्याने पाचवा टप्पा हा चाकणच्या उत्तर-पश्चिम भागात येणार असल्याने निम्मे चाकण शहर हे एमआयडीने वेढले जाणार आहे. 2खेड तालुका हे एक कुटुंब आहे आणि आता या कुटुंबात साप निघाला आहे. हा साप मारण्यासाठी आपणास राजू शेट्टी या पाहुण्यांची काठी घ्यावी लागत आहे. कारण, आपल्या घरातील लोक मूग गिळून गप्प आहेत. त्यांना आपल्या कुटुंबाचे काहीही देणे-घेणे नाही. फक्त मतापुरते यायचे आणि हेतू साध्य करून घ्यायचा, असा आरोप शेतकरी करीत आहेत.