शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीसाठी राज्यात सीईटीच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 20:46 IST

राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षाच (एमएचटी-सीईटी) राहणार असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे, दि. 8 - राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षाच (एमएचटी-सीईटी) राहणार असल्याचे तंत्र शिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने ‘सीईटी’ची तयारी करण्याबाबत ‘डीटीई’ला पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे सध्यातरी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) की सीईटी हा विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दुर होणार आहे.चालु शैक्षणिक वर्षापासून देशपातळीवरील वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रान्स टेस्ट (नीट) घेण्यास सुरूवात झाली आहे. तर राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश यंदा सीईटीमार्फत करण्यात आले. देशपातळीवर संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई बंधनकारक होती. ‘नीट’च्या पार्श्वभुमीवर पुढील वर्षीपासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ ही एकच परीक्षा असणार की नाही, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ‘डीटीई’च्या अधिकाºयांनाही याबाबत ठामपणे काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत शासनाने ‘डीटीई’ला दि. २४ जुलै रोजी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये राज्यात ‘सीईटी’ घेण्याबाबत स्पष्ट सुचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ‘डीटीई’कडून मंगळवारी परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. सीईटीची पातळी, अभ्यासक्रम, पध्दती व दर्जा हा राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई’प्रमाणे निश्चित करण्यास शासनो मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ‘सीईटी’मध्ये इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर अधिक भर असेल. तर इयत्ता अकरावीला कमी महत्व दिले जाईल. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून नेमका अभ्यासक्रम व त्याचे प्रमाण लवकरच जाहीर केले जाईल. या परीक्षेत नकारात्मक गुणपध्दतीही राहणार नाही. परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांचा दर्जा हा ‘जेईई’प्रमाणे तर जीवशास्त्र विषयाचा दर्जा ‘नीट’प्रमाणे असेल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) अद्याप देशपातळीवरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ बंधनकारक केलेली नाही. त्यामुळे जेईईमध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाचा होता. त्यानुसार शासनाकडून ‘डीटीई’ला सीईटीच्या तयारीबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार ‘सीईटी’ घेतली जाईल. - दयानंद मेश्राम, सहसंचालकतंत्रशिक्षण संचालनालय

जेईईचे सावट दूर...राज्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये जेईईबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. पण आता राज्य शासनाकडून पहिल्यांदाच सीईटीबाबत भुमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सीईटीची तयारी करण्याबाबत सुचना देण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जेईईचे सावट सध्यातरी दुर झाले असून विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे.- हरीष बुटले, प्रवेश पुर्व परीक्षांचे अभ्यासक