शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बीएस्सी, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना सीईटीची सक्ती

By admin | Updated: March 21, 2016 00:50 IST

राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे.

पुणे : राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. त्यामुळे अभियांत्रिकी पदवीप्राप्त आणि बीएस्सी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्य शासनाच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे येत्या ५ मे रोजी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या २२ मार्चपर्यंत सीईटीसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. दर वर्षी तंत्रशिक्षण विभागाकडून घेतली जाणारी सीईटी परीक्षा यंदा प्रथमच प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून अभियांत्रिकी, मेडिकल व फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश दिला जाईल. परंतु, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम आणि बीएस्सी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांना सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे बंधन नाही.डीटीईचे अधिकारी एन. बी. पाटील म्हणाले, की राज्यातील प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक आहे. राज्यातील बीएस्सी आणि अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणारे अनेक विद्यार्थी द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेतात.