शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंना दमदाटी प्रकरणाची चौकशी

By admin | Updated: October 29, 2016 04:36 IST

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लहूराज माळी यांना गुरुवारी एका आर्किटेक्टकडून दमदाटी करण्यात आल्या प्रकरणाची सखोल

पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लहूराज माळी यांना गुरुवारी एका आर्किटेक्टकडून दमदाटी करण्यात आल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. बापट यांनी शुक्रवारी सकाळी एसआरए कार्यालयामध्ये जाऊन लहूराज माळी यांची भेट घेतली. झालेल्या प्रकाराची त्यांनी माळी यांच्याकडून माहिती घेतली.हडपसर येथील एसआर प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावावे, या कारणावरून आर्किटेक्ट संदीप महाजन यांनी माळी यांना दमदाटी केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. त्यानंतर माळी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आर्किटेक्टकडून एसआरएच्या कोणत्या प्रकल्पासाठी दबाव टाकला गेला? सद्य:स्थितीत प्रलंबित प्रकरणांची काय स्थिती आहे? याची माहिती बापट यांनी या वेळी घेतली.एसआरएच्या कामांना गती मिळाली पाहिजे; पण नियमांचे पालन करून ही सर्व कामे मार्गी लागणे अपेक्षित आहे. गुरुवारी एसआरए कार्यालयात घडलेल्या प्रकाराबाबात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. चौकशी अधिकारी नेमून सखोल चौकशी केली जाईल. परिस्थिती बदलत आहे, त्यानुसार एसआरएच्या नियमावलीमध्ये बदल आवश्यक आहे.- गिरीश बापट, पालकमंत्री