पुणे : मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाचा १० टक्के निधी कमी करण्यामागे केंद्र सरकारचा पुण्याविषयीचा आकस असल्याची टीका काँग्रेसने केली.
पुण्यातील भाजप नेत्यांनी केंद्र सरकारला धोरण बदलायला लावून पुन्हा २० टक्के निधी मिळवावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. स्वारगेट ते कात्रज या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २० टक्केऐवजी फक्त १० टक्केच निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिकेला आता २०० कोटीऐवजी ७३५ कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे तिवारी म्हणाले.
महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत कमी झाले आहेत. त्यात कोरोना साथीमुळे खर्चाला मर्यादा आहेत, तरीही पालिकेतीच्या स्थायी समितीने या वाढीव खर्चाला घाईत मंंजुरी दिली. आता हा विषय सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी येईल, त्यावेळी तरी यावर चर्चा व्हावी असे तिवारी म्हणाले.