शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावचे केंद्र हे सर्वोत्तम केव्हीके

By admin | Updated: July 6, 2017 02:40 IST

शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अथांग सागर, गरजेनुरूप राबवत असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प, शेतकरी, तरुण आणि कृषी

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा अथांग सागर, गरजेनुरूप राबवत असलेले नावीन्यपूर्ण प्रकल्प, शेतकरी, तरुण आणि कृषी पदवीधरांना कृषी उद्योजकतेकडे घेऊन जाण्याकरिता राबवत असलेले स्तुत्य उपक्रम हे केव्हीकेच्या (कृषी विज्ञान केंद्र) कामकाजाची पोच देऊन जाते, असे मत  भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहायक महासंचालक (कृषी विस्तार) डॉ. वेदप्रकाश चहल यांनी येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान व्यक्त केले.या वेळी पुणे येथील अटारी झोन-८ चे संचालक डॉ. लाखनसिंग, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, केव्हीकेचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. एस. राजपूत, अटारी झोन-८ पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. कोळेकर उपस्थित होते.डॉ. वेदप्रकाश चहल हे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली येथे सहायक महासंचालक या पदावर कार्यरत आहेत. भारतातील ६६५ केव्हीकेचा ते कार्यभार संभाळतात. केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्याची माहिती दिली.डॉ. वेदप्रकाश चहल यांनी केंद्राच्या कार्याची माहिती  घेतली. अनिलतात्या मेहेर यांनी स्वागत केले.  राहुल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. बी. एस. राजपूत यांनी आभार मानले.विविध प्रकल्पांची पाहणी; वृक्षारोपण केलेडॉ. वेदप्रकाश चहल आणि डॉ. लाखनसिंग यांनी केव्हीकेच्या वसुंधरा फार्म येथे भेट दिली. या वेळी त्यांनी डाळिंब, सीताफळ, पेरू, आंबा या बागांना भेट दिली. तसेच १.५ कोटी लिटरचे शेततळे, समतल चर करून लागवड केलेली आंब्याची बाग, पाणी आणि खत व्यवस्थापन याकरिता केलेली स्वयंचलित सिंचनप्रणाली, पीक प्रात्यक्षिके पाहून ते प्रभावित झाले.  याचबरोबर शेळीपालन, मुक्त गोठा, युरिया ब्रिकेट्स उत्पादन प्रकल्प, डाळ मिल, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, गांडूळ खत यासारख्या प्रकल्पांना भेट देऊन प्रशंसादेखील केली. डॉ. व्ही. पी. चहल आणि डॉ. लाखनसिंग यांच्या हस्ते वसुंधरा फार्म येथे नारळाचे रोपटे लावून वृक्षारोपण करण्यात आले.