शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एसपीव्हीबाबत केंद्राने मागविल्या सूचना

By admin | Updated: December 19, 2015 03:16 IST

स्मार्ट सिटी आराखड्यातील स्पेशल पर्पज व्हेईकलला (एसपीव्ही) नगरसेवकांकडून प्रचंड विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर एसपीव्हीच्या रचनेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाने सुरू केली आहे.

पुणे : स्मार्ट सिटी आराखड्यातील स्पेशल पर्पज व्हेईकलला (एसपीव्ही) नगरसेवकांकडून प्रचंड विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर एसपीव्हीच्या रचनेमध्ये बदल करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाने सुरू केली आहे. एसपीव्ही रचनेबाबत केंद्राने महापालिकांकडून सूचना मागविल्या असून, त्याचा विचार करून एसपीव्हीला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे महापालिकेच्या आराखड्यास नुकतीच मुख्य सभेने अंतिम मंजुरी दिली आहे. एसपीव्हीमुळे महापालिकांची स्वायत्तता धोक्यात येण्याची भीती व्यक्त करून यावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या नगरसेवकांनी जोरदार टीका केली. त्याचबरोबर एसपीव्हीचे अधिकार कमी करणाऱ्या ५ उपसूचना मांडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने एसपीव्हीच्या रचनेबाबत महापालिकांकडून सूचना मागविल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.पुण्याबरोबरच राज्यातील अन्य महापालिकांनीही एसपीव्हीबाबतच्या उपसूचना देऊन प्रस्ताव पाठविले आहेत. स्मार्ट सिटीची स्पर्धा संपूर्ण देशामध्ये घेतली जात असल्याने, एसपीव्हीबाबतचे नियम संपूर्ण देशात एकच असणार आहेत. एसपीव्हीला कर लावण्याचे, गोळा करण्याचे, कर्जे काढण्याचे, मालमत्ता गहाण ठेवण्याचे अधिकार देण्यात येऊ नयेत, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. केंद्राकडून स्पर्धेतील विजेत्यांना एसपीव्ही स्थापन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राकडून येणारा निधी थेट एसपीव्हीला मिळणार आहे; मात्र कंपनी स्थापन न झाल्यास, हा निधी मिळण्यामध्ये अडचणी येणार आहेत. स्मार्ट सिटीच्या एसपीव्हीची रचना केंद्राने लवकर जाहीर करून देणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पुण्याची निवड झाल्यास, त्यानुसार लगेच कंपनीची स्थापना करणे आवश्यक ठरणार आहे. कंपनी स्थापन झाल्याने वेगाने कामे मार्गी लागावीत, याकरिता महापालिकेकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. ते करार बंधनकारक नाहीस्मार्ट सिटी आराखडा तयार करताना, महापालिकेने १४ संस्थांबरोबर करार केले असून, ते करार बंधनकारक नसल्याचे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेने परस्पर २० संस्थांबरोबर करार केल्याची टीका नगरसेवकांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कुमार यांनी सांगितले की, केवळ १४ संस्थांबरोबर आराखडा तयार करण्यामध्ये मदत करण्यासाठी करार करण्यात आले. उर्वरित ६ संस्थांसोबत करार केले नाहीत, तर त्या केवळ सर्पोटिंग म्हणून पालिकेसोबत कार्यरत होत्या. आराखडा चांगला व्हावा म्हणून हे करार करण्यात आले.’