शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्याने मदत द्यावी

By admin | Updated: June 10, 2017 02:21 IST

पुणेकरांना फसवून भारतीय जनता पार्टीने २४ तास पाणी योजनेसाठी कर्जरोख्यांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. काँग्रेसचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणेकरांना फसवून भारतीय जनता पार्टीने २४ तास पाणी योजनेसाठी कर्जरोख्यांचा प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. काँग्रेसचा या योजनेला कधीही विरोध नव्हता, कर्ज काढण्याला मात्र आहे. संपूर्ण राजकीय सत्ता दिल्यानंतरही पुणेकरांवर भाजपाने हा कर्जाचा बोजा टाकला आहे, अशी टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या प्रस्तावावरील भाषणात केली.शिंदे म्हणाले, ‘‘या प्रस्तावात अनेक चुका आहेत. मुख्य म्हणजे त्यात तब्बल २२५ कोटी रुपयांचे, या कामाशी काहीही संबंध नसलेले काम स्थायी समिती, सर्वसाधारण समिती इतकेच काय अधिकाऱ्यांच्याच इस्टिमेट कमिटीची संमती नसताना घुसवण्यात आले आहे. भाजपाला हे चालले हीच मोठी फसवणूक आहे. कर्जाची रक्कम २ हजार २६४ कोटी रुपये आहे, पण विषयपत्रात आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यापुढे २० टक्के जास्त असे नमूद केले आहे. ही रक्कम ४५० कोटी रुपये आहे. त्याचे आयुक्त काय करणार आहेत ते भाजपाने पुणेकरांना सांगावे.’’कर्ज काढण्यापूर्वीच आयुक्तांनी हुडको या कंपनीबरोबर कर्ज, व्याजदर यासंबंधी पत्रव्यवहार केला. याबाबत सर्वसाधारण सभा, स्थायी समिती इतकेच काय पण पदाधिकाऱ्यांनाही माहिती दिली नाही. हा अधिकार त्यांना कोणी दिला? हेही भाजपाला चालले. काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने महापालिकेला अनेक योजना दिल्या. त्यात ५० टक्के केंद्र, २० टक्के राज्य व ३० टक्के महापालिका अशी आर्थिक विभागणी होती. ही योजना याप्रमाणे करण्यात भाजपाला काय अडचण आहे? गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी सत्ता मागितली व पुणेकरांनी त्यांना ती दिली. तरीही त्यांच्या डोक्यावर या ३ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा टाकला गेला आहे.