शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफ’वर केंद्राचा पुन्हा डल्ला

By admin | Updated: April 26, 2016 01:12 IST

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने पुन्हा एकदा त्यांच्यात असंतोष निर्माण केला आहे.

पुणे : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने पुन्हा एकदा त्यांच्यात असंतोष निर्माण केला आहे. भारतीय जनता पक्षप्रणीत केंद्र सरकारच्या या निर्णयाचा त्यांचेच अंग असलेल्या भारतीय मजदूर संघ या देशव्यापी कामगार संघटनेने जोरदार प्रतिवाद केला आहे. २७ एप्रिलला संघाच्या वतीने देशभर आंदोलन केले जाणार आहे.केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या फायनान्स अ‍ॅण्ड इनव्हेस्टमेंट आॅडिट कमिटीचे कामगार प्रतिनिधी म्हणून सदस्य असलेल्या भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रभाकर भानुसरे यांनी ही माहिती दिली. भविष्य निर्वाह निधीचा व्याजदर या समितीकडून निश्चित करण्यात येतो. सन २११४-१५ मध्ये केंद्र सरकारला भविष्य निर्वाह निधीमधून केलेल्या गुंतवणुकीवर ३४ हजार ८४४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. समितीने त्याचा आधार घेत भविष्यनिर्वाह निधीचा सन २०१५-१६ साठी ८.९५ टक्के व्याजदर निश्चित केला होता. इतके व्याज दिल्यानंतरही केंद्र सरकारकडे ६७३ कोटी रूपये शिल्लक राहत होते, अशी माहिती भानुसरे यांनी दिली.केंद्र सरकारने समितीचा निर्णय डावलून ८.८० टक्के असा व्याजदर निश्चित केला. त्यामुळे केंद्र सरकारकडे ८०० कोटींपेक्षा अधिक रक्कम शिल्लक राहत होती. आता नव्या वर्षांसाठी (सन २०१६-१७) तरीही केंद्र सरकारने भविष्यनिर्वाह निधीसाठी व्याजदर घटवून ८.७५ टक्के केला आहे. वास्तविक भविष्य निर्वाह निधी हा कर्मचाऱ्यांचाच पैसा असतो. केंद्र सरकार तो विविध उद्योगांमध्ये गुंतवत असते. त्यातून मिळणाऱ्या नफ्याचे वाटप कामगारांना व्याजाच्या रूपाने करण्यात येते. त्यावरच घाला घालण्याचा प्रकार केंद्र सरकार करीत आहे, अशी टीका याबाबत बोलताना भानुसरे यांनी केली. केंद्राचा हा निर्णय अन्यायकारक असल्याने भारतीय मजदूर संघाच्या वतीने त्याचा प्रतिकार करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. त्यासाठी २७ एप्रिलला देशव्यापी निदर्शने करण्यात येणार असल्याचे भानुसरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)