शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाटकाच्या प्रयोगावर सेन्सॉरशिप ठरावी

By admin | Updated: February 13, 2017 01:12 IST

नाटक, चित्रपट हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमांतून निखळ करमणूक अनुभवायला मिळते. नाटक, चित्रपट विचारप्रवर्तक असू शकतात.

नाटक, चित्रपट हे अभिव्यक्तीचे उत्तम माध्यम आहे. या माध्यमांतून निखळ करमणूक अनुभवायला मिळते. नाटक, चित्रपट विचारप्रवर्तक असू शकतात. मात्र, त्यातून मोठे सामाजिक बदल किंवा क्रांती घडत नाही.मुंबई ही नाट्यव्यवसायाची बाजारपेठ असेल, तर पुणे ही प्रयोगशाळा आहे, असे मला वाटते. नवोदित कलाकार येथे जीव ओतून काम करतात, व्यासपीठाचा उत्तम उपयोग करून घेतात, घडतात आणि संपूर्ण तयारीनिशी रंगभूमीवर उतरतात. गेल्या काही वर्षांत रंगभूमी तसेच चित्रपटसृष्टीमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. तरुणांचा मालिका, चित्रपटांकडील ओघ वाढला आहे. कारण, हजारो तरुणांना सामावून घेण्याएवढा नाट्यव्यवसाय मोठा आणि व्यापक नाही. तसेच, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय करूनही नाटक हा पाया असल्याने त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.‘हे राम नथुराम’ या नाटकाचे १००० हून अधिक प्रयोग यशस्वी झाले आहेत. या नाटकाविरोधात अचानक आंदोलने सुरू झाली आहेत. पुण्यात आंदोलने करून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला, तर नागपूरमध्ये प्रेक्षकांनी तिकिटेच न काढून प्रयोग रद्द करण्यास भाग पाडले. एखाद्या बाबीचा निषेध आपण कशा प्रकारे नोंदवतो, हे महत्त्वाचे आहे. कलावंतांनी नाटके लोकशाही पद्धतीने, मनापासून करत राहायला हवीत. नाटक यशस्वी होणार की अपयशी, हे प्रेक्षकांना ठरवू द्यायला हवे.नाटकांच्या निर्मितीची संख्या वाढली असली तरी मोजकीच नाटके का चालतात, याचा सखोल विचार करायला हवा. नाटकांमधून नेमके चांगले काय देता येईल, याचा सखोल अभ्यास केल्यास यशस्वी नाटकांची संख्या नक्कीच वाढू शकते. मी बऱ्याच नाट्यस्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. या स्पर्धांमध्ये सादर होणारी नाटके, हाताळले जाणारे विषय, तरुण कलाकारांकडून नाटकासाठी घेतली जाणारी मेहनत हे चित्र खूप आशादायी आहे. पुणे, मुंबई वगळता, महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक तरुण विविध विषय घेऊन समोर येत आहेत ही जमेची बाजू आहे. अनेक कलाकारांसाठी नाटकांमधून मालिका, चित्रपटांचे प्रवेशद्वार खुले होते. परंतु, नाटकातील जिवंतपणा इतर कोणत्याही माध्यमात अनुभवायला मिळत नाही. चित्रपटांतही आशयघन विषय हाताळले जात आहेत. त्यामुळे समांतर चित्रपट ही संकल्पना आता अस्तित्वात राहिलेली नाही. चांगले विषय हाताळताना निर्माते, दिग्दर्शकांना व्यावसायिक गणितेही सांभाळावी लागतात. केवळ प्रमोशन आणि गाण्यांचा भडिमार केला, तरच चित्रपट हिट होतो, हा फॉर्म्युला मागे पडला आहे. तरुण प्रेक्षकांना भावणारा, त्यांचे भावविश्व उलगडणारा सिनेमा असेल तर तोही चांगला व्यवसाय करतो.सोशल मीडियाचे दालन आज सर्वांसमोर खुले आहे. या माध्यमातून आपण एकाच वेळी अनेकांशी संपर्कात राहू शकतो. मात्र, सोशल मीडियावर आपण कशा प्रकारे व्यक्त होतो, यावर सर्व गणित अवलंबून असते. सोशल मीडियाचा वापर करताना आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावे, याची मर्यादा घालून यायला हवी. डेली सोपमुळे कथानकाची किंमत कमी होते, त्याचप्रमाणे, खासगी बाबी या व्यासपीठावर शेअर केल्या जात असल्याने त्याची किंमत कमी झाली आहे. विचार मांडण्याचे हे उत्तम व्यासपीठ आहे. त्यामुळे नाटक, चित्रपटांसाठीही सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा.