शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नादब्रह्माची अनुभूती देणारा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2016 02:13 IST

पवित्र इंद्रायणीच्या घाटावर जमलेला ९ हजार ३३ तबला व मृदंगवादकांचा अनोख्या ‘नादब्रह्मा’ची अनुभूती रविवारी आली.

आळंदी : पवित्र इंद्रायणीच्या घाटावर जमलेला ९ हजार ३३ तबला व मृदंगवादकांचा अनोख्या ‘नादब्रह्मा’ची अनुभूती रविवारी आली. कर्णमधुर नाद, घाटावरचे नयनरम्य दृश्य पाहून अलंकापुरीच्या घाटावर भक्तीचा मेळा जमल्याची अनुभूती हजारोंच्या संख्येने जमलेल्या येत होती. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. निमित्त होते पखवाज व मृदंगवादकांच्या संमेलनाचे. माईर्स एमआयटी, अखिल भारतीय मृदंगाचार्य संघटना आणि श्रीक्षेत्र आळंदी, देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हे पहिलेच संमेलन भरविण्यात आले होते. आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कीर्तनकार हभप श्री. बाबामहाराज सातारकर, थोर आध्यत्मिक गुरू स्वामी परिपूर्णांनंद, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, पद्मश्री प्रा. डॉ. येल्ला व्येंकटश्वरा, ख्यातनाम बासरीवादक अमित काकडे हे विशेष सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर विराजमान होते .श्री क्षेत्र आळंदी येथील विकासकामांची पूर्तता आणि विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.राहुल कराड यांनी प्रास्ताविक केले . याप्रसंगी गरीब व होतकरू पखवाजवादक वारकरी विद्यार्थ्यांना विश्व शांती केंद्राच्या वतीने ७५ पखवाज भेट म्हणून देण्यात आले. यातील प्रातिनिधिक स्वरूपातील पखवाज आळंदी येथील ज्योतिराम काटे या बालवारकऱ्याला देण्यात आला. अखिल भारतीय पखवाज व मृदंग संमेलनाच्या निमित्ताने भारतातून ज्ञानेश्वरीच्या जेवढ्या ओव्या आहेत तेवढेच ९ हजार ३३ मृदंग व पखवाजवादकांनी एकाच मंचावर येऊन आपली सेवा सादर केली. नादब्रह्माची अनुभूती देणारा हा एक अलौकिक सोहळा असेल. वारकरी संप्रदायामध्ये पखवाज, मृदंग, वीणा व टाळ या वाद्यांना विशेष महत्त्व आहे. या मृदंग संमेलनात भाग घेणाऱ्या मृदंगाचार्यांना संस्थेच्या वतीने माऊली व जगद्गुुरूंची प्रतिमा असलेली शाल, माऊलींची प्रतिमा, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.(वार्ताहर)