या कार्यक्रमासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी एस. पी.रुईकर हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणादायी आहे ते पुढे चालवणे काळाची गरज आहे असे मत रुईकर यांनी व्यक्त केले. अनिता लोहोकरे यांनी स्वागत केले व मुख्याध्यापक मनोज जगताप यांनी प्रास्ताविक केले .
सावित्रीच्या लेकीचे गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या वेशातभूषेत आलेल्या सर्व मुलींनी सावित्री फुले यांची माहिती आपल्या भाषणातून सादर केली
या कार्यक्रमास शर्मिला गायकवाड, अनिता लोहोकरे, मनीषा थोपटे ,माधुरी खपाटे, यशवंत कंक व मुख्याध्यापक मनोज जगताप उपस्थित होते.