शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाश्रमदानानं साजरा करा महाराष्ट्र दिन: आमीर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 12:18 IST

भविष्यात पानी फाऊंडेशन शहरातील पाणी प्रश्नावर काम करणार

पुणे : आगामी महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे रोजी शहरवासीयांनी मोठ्या संख्येनं जवळच्या खेड्यात जाऊन श्रमदान करावं असं आवाहन अभिनेते आणि पानी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी पुण्यात बोलताना केलं. यासाठी jal mitra.paanifoundation.in या लिंकवर जाऊन नोंदणी करावी असंही त्यांनी सांगितलं.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावं, यासाठीच्या पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आलं. 'महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये एवढी ताकद आहे की, लोक स्वतःहून पाण्याची अडचण सोडवतील. याबद्दल मला विश्वास वाटतो. पुढील पाच वर्षात पानी फाऊंडेशनची गरज वाटू नये,' असं मत आमीरनं व्यक्त केलं. केवळ ग्रामीण भागातील पाणलोट क्षेत्रातील कामावर थांबणार नसून भविष्यात शहरातील पाणी प्रश्नावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही आमीरनं सांगितलं. स्वदेस चित्रपटातून या कामासाठी प्रेरणा मिळाली का, असं विचारले असता, अद्याप स्वदेस पाहिला नसल्याचं उत्तर आमीरनं दिलं. पानी फाऊंडेशनची संकल्पना सत्यमेव जयते या कार्यक्रमातून आली. या कार्यक्रमाचं तिसरं पर्व झाल्यानंतर एका विषयावर सखोल काम करण्याचा विचार होता आणि आम्ही पाणी व महाराष्ट्र या विषयावर संशोधन करून अडचणी समजून कामाला सुरुवात केली, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सिम्बॉयसिसचे डॉ. शं. ब. मुजुमदार, विद्या येरवडेकर, संजीवनी मुजुमदार उपस्थित होते.महाराष्ट्रातल्या 1 कोटी 10 लाख लोकांनी 1 मे रोजी आयोजित केलेल्या महाश्रमदानात सहभागी व्हावं, असा आमचा संकल्प असल्याचं सत्यजित भटकळ यांनी सांगितलं. शहरी आणि ग्रामीण लोकांचं भावनिक नातं निर्माण व्हावं, असाही यामागचा उद्देश असल्याचं भटकळ म्हणाले. महाश्रमदानासाठी किती पैसा खर्च झाला, हा मुद्दा नसून त्यात किती लोक सहभागी झाले, हे महत्त्वाचं असल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी म्हटलं.   

टॅग्स :Aamir Khanआमिर खान