तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सावता महाराज मंगल कार्यालयात शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील गणेश मंडळांची गणेशोत्सवानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शेडगे बोलत होते.
मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची साधारण चार फूट, तर घरगुती गणपती मूर्तींची उंची साधारण दोन फुटांपर्यंत असावी. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कल्पकतेने कोविडच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीविषयक विविध प्रकारचे उपक्रम राबवून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा. पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मंडळांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक नेमावेत व आपल्या गणेश मूर्तीच्या सुरक्षेची जबाबदारी आपणच पार पाडावी, असे शेडगे यांनी सांगितले.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सरपंच अंकिता भुजबळ,उपसरपंच नवनाथ ढमढेरे,पोलीस पाटील पांडुरंग नरके,आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे,ग्रामपंचायत सदस्य ॲड. सुरेश भुजबळ,संदीप ढमढेरे,मधुकर भूमकर,सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ कर्हेकर,विविध मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
तळेगाव ढमढेरे येथे गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे
050921\jpg05092021.jpg
?????? ?????? ???? ????????? ???????? ?????????????? ?????????? ?????? ????? ???????? ????? ?????