पुणे : आकर्षक फुलांची आरास करून सजविलेले शारदा गजानन मंदिर… शारदा-गजाननाच्या मूर्तीला अर्पण केलेली देखणी वस्त्रे अन् फुलांचे हार आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर… अशा उत्साही वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचा वाढदिवस साजरा झाला. ऑनलाईन माध्यमाद्वारे असंख्य भाविकांनी लाईव्ह या वाढदिवस सोहळ्याचा आनंद घेतला.
यावेळी श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, श्री भाऊसाहेब रंगारी मंडळचे पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सूरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर, आदी उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, “अखिल मंडई मंडळाच्या प्रासादिक मूर्तीचा वाढदिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो. ११ किलो वजनाचा केक तसेच माव्याचा केक यावेळी कापण्यात आला. तसेच भाविकांना प्रसाद म्हणून शिरा देण्यात आला.”