शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नारायणगावावर सीसीटीव्ही वॉच

By admin | Updated: May 3, 2017 01:45 IST

वारूळवाडी व नारायणगाव शहर सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आले आहे. गुन्हेगारी तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर आता

नारायणगाव : वारूळवाडी व नारायणगाव शहर सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आले आहे. गुन्हेगारी तसेच बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर आता नारायणगाव पोलिसांची करडी नजर राहणार आहे़ दोनही शहरांतील प्रमुख भागांमध्ये एकूण २२ कॅमेरे बसविण्यात आले आहे. उर्वरीत भागात १५ कॅमेरे लावण्यात येणार आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर यांनी दिली़नारायणगाव पोलीस ठाण्याच्या प्रेरणेतून वारूळवाडी व नारायणगाव ग्रामपंचायत यांच्या सहभागातून तसेच रा़ प. सबनीस विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र वाघोले, नंदू शेटे, दिलीप कोठारी व इतर काही मान्यवरांच्या सहकार्याने २२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत़ पुढील काही दिवसांत कोल्हेमळा ग्रामीण रुग्णालय रोड, महावीर भवन रोड, जुन्नर रोड व उर्वरीत प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ कॅमेरे बसविण्यात आल्यानंतर त्याचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई व सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय. मुजावर यांच्या उपस्थितीत करण्यात आला़ या वेळी वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे, नारायणगावचे माजी सरपंच संतोश वाजगे, बाबू पाटे, संजय वारूळे, ग्रा़ पं़ सदस्य रामदास अभंग, आरीफ आतार व ग्रामस्थ पोलीस अधिकारी उपस्थित होते़सीसीटीव्हीमुळे संपूर्ण शहरातील घडामोडींवर नारायणगाव पोलिसांचे लक्ष राहणार आहे़ बेकायदेशीर कृत्य तसेच रोडरोमिओ, मंगळसूत्र चोर, भुरटे चोर यांच्यावर वचक ठेवणे शक्य होणार आहे. शहरात वारंवार होणारी वाहतूककोंडी यावरदेखील पोलिसांचे लक्ष राहील़ बेजबाबदारपणे वाहन चालविणाऱ्या तसेच बेशिस्तरित्या वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर त्वरित दंडात्मक कारवाई नारायणगाव पोलीस करणार आहेत़.(वार्ताहर)