शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया फंडातून पीएमपीमध्ये सीसीटीव्ही

By admin | Updated: October 2, 2015 01:11 IST

पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच पीएमपीच्या प्रमुख मार्गांवरील बस मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे

पुणे : पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी लवकरच पीएमपीच्या प्रमुख मार्गांवरील बस मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाच्या निर्भया फंडातून मागण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पीएमपी प्रशासनाकडून लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्यात येणार आहे.शहरात पीएमपीने दररोज तब्बल १२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात ५० टक्क्यांहून अधिक महिलांची संख्या आहे. नोकरदार आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे; मात्र प्रवाशांच्या तुलनेत पीएमपीची संख्या कमी असल्याने या महिलांना छेडछाड, धक्काबुक्की, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक बसमध्ये सुरक्षेसाठी पोलीसही नेमणे शक्य नसल्याने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना आळा घालणे शक्य होत नाही, तर महिलांकडून पुन्हा प्रवास नको म्हणून या प्रकाराबाबत तक्रारही दिली जात नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महिलांसाठी पीएमपीचा प्रवास असुरक्षित बनत चालला आहे. तर, या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक बसमध्ये सुरक्षारक्षक नेमणे पीएमपीला शक्य नाही. त्यामुळे लवकरच प्रमुख मार्गांवरील बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ----------सीसीटीव्हीसाठी निर्भया फंड दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आल्याने केंद्र शासनाच्या २०१३-१४ च्या अंदाजपत्रकात महिलांच्या सुरक्षेसाठी दोन हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्याला ‘निर्भया फंड’ असे नाव देण्यात आले आहे, तर या निधीत २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात १ हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे. प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा निधी वापरला जाणार आहे. त्यानुसार, महिला सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पीएमपीकडून जिल्हा प्रशासनास पाठविण्यात येणार आहे. त्यात हा निधी निर्भया फंडातून द्यावा, अशी मागणी केली जाणार आहे.