पुणे : महापालिकेच्या कोट्यवधी रूपयांच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच शंका उपस्थित केली जाते. आता मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रभागात मात्र अशी शंका घेण्याला काही वावच राहणार नाही. काम सुरू असलेल्या ठिकाणी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेच बसवले असून त्याचे वायफाय कनेक्शन मोबाईलला जोडले आहे.मोरे यांची या पंचवार्षिकमधील पहिलीच दोन विकासकामे मंजूर झाली असून, त्यांना आज सुरूवात झाली. ड्रेनेजलाइन टाकण्याची ही कामे आहेत. मोरे यांनी या कामांच्या उद््घाटनाबरोबरच त्यावर सीसीटीव्ही बसवले आहेत. ठेकेदारांनाही त्यांनी याची कल्पना दिली आहे. काम सुरू असतानाचे सर्व चित्रीकरण या कॅमेºयांमधून होईल. तसेच, ते मोरे यांना त्यांच्या मोबाईलवर दिसेल. सुरू झालेल्या दोन्ही कामांवर त्यांनी असे कॅमेरे बसवले आहेत.
ठेकेदारांच्या कामांवर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:17 IST