शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीने कुटुंबाला केले वर्षासाठी बहिष्कृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सासवड : भातू समाजातील न्यायाधीश व्यक्तीला शिवीगाळ केली म्हणून जात पंचायतीने दोन महिलांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून १ वर्षासाठी बहिष्कृत करण्याचा ठराव केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथे घडली. जर समाजात परत यायचे असल्यास त्या मोबदल्यात ५ बोकड, पाच दारूच्या बाटल्या व १ लाख रुपये दंडाची मागणी करण्यात आली. ती न दिल्यास जात पंचयातीने कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या प्रकरणी पीडित कुटुंबाने पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठात सुरेश रत्न बिनवात (रा. सत्वनगर, महंमदवाडी), सप्त पन्नालाल बिनवात (रा. सत्वनगर), नंदू आत्राम रजपूत (रा. वारजे जकात नाक्याजवळ), मुन्ना रमेश कचरावत (रा. वारजे माळवाडी), आनंद रामचंद्र बिनावत (रा. सातवनगर), देविदास राजू चव्हाण (रा. नऱ्हे गाव), देवानंद राजू कुंभार (रा. धनकवडी) यांच्याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना पुरंदर तालुक्यातील गराडे येथील असल्याने हा गुन्हा सासवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

सुहानी ऊर्फ रिटा विकास यांचे वडील मनोज रामचंद्र कुंभार यांचे निधन झाले. सुहानी यांची आई नंदा मनोज कुंभार या धनकवडी येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपासून जात पंचायतीचे पंच सुरेश बिनवात व मुन्ना बिनवात व इतर सुहानी यांच्या मागे त्यांच्या मालमत्तेचा निवाडा करण्याचा आग्रह धरत होते. याला त्यांच्या आई नंदा कुंभार यांनी नकार दिला. यामुळे त्यांना पंचांनी शिवीगाळ केली. ही बाब नंदा यांनी त्याची मुलगी सुहानी हिला सांगितले. यावर सुहानी यांनी समाजाच्या ग्रुपवर मेसेज करत माझ्या आईला व बहिणीला त्रास देऊ नका, असे सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत सुरेश बिनावत यांनी समाजातील १२ गावचे पदाधिकारी, १२ जातीचे सर्व पाहुणे मित्र मंडळी यांना गेल्या महिन्यात ३ नोव्हेंबरला राजलीला मंगल कार्यालय येथे उपस्थित राहण्यास सांगत रिटा व पूजा या दोघी बहिणींना सर्व समाजासमोर माझी मागण्यास सांगितले. मात्र, त्यांनी नकार दिल्याने त्यांनी १ वर्षासाठी बहिष्कृत केले तसेच त्यांना दंड ठोठावला. तसा व्हिडीओ समाजाच्या ग्रुपवर पाठवला. याविरुद्ध सुहानी विकास कुंभार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.