शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विष तस्करी प्रकरणी सर्पमित्रही जाळ््यात

By admin | Updated: January 5, 2017 03:31 IST

सर्प विष तस्करी प्रकरणी सांगली येथील एका सर्पमित्राला चाकण पोलिसांनी काल (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली.

चाकण : सर्प विष तस्करी प्रकरणी सांगली येथील एका सर्पमित्राला चाकण पोलिसांनी काल (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास अटक केली. या प्रकरणातील खारगेला साप पुरविणारे सांगलीतील आणखी दोन सर्पमित्र असून, ते फरार आहेत. विवेक शिवाजी सुतार (वय २७, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या सर्पमित्र आरोपीचे नाव आहे. विष विकत घेणाऱ्यांपैकी एक उत्तराखंड, एक उत्तर प्रदेशातील आहेत व साप पुरविणारे सांगलीतील आणखी दोन जण आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण पोलिसांनी यापूर्वी तीन जणांना अटक केली असून, आता अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. त्यात रणजित पंढरीनाथ खारगे (वय ३७, रा. ए १/४०६, सारा सिटी, खराबवाडी, चाकण, मूळ गाव कुंडल, ता. पलूस, जि. सांगली), धनाजी अभिमान बेळकुटे (वय ३०, मूळ गाव वरकुटे मूर्ती, ता. करमाळा, जि. सोलापूर) व आयसेरा बायोलॉजिकल प्रा. लि.) या विष घेणाऱ्या कंपनीचा संचालक डॉ. नंदकुमार कदम यांचा समावेश आहे. फरार दोन सर्पमित्र व उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील दोन परप्रातीयांना ताब्यात घेतल्यावर सर्प विषाची तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होणार आहे.चाकण पोलीस, वन विभाग यांनी संयुक्त कारवाई करून मंगळवारी (२७ डिसेंबर २०१६) खराबवाडी येथील सारा सिटीत फ्लॅटवर छापा मारून खारगे व बेळकुटे या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ४० घोणस, ३१ कोब्रा नाग व विषाच्या तीन बाटल्या आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. सापांचे विष तस्करी केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी चार जानेवारीला संपली आहे.आरोपी कदम या डॉक्टरची स्वत:ची कंपनी असून आरोपी खारगे याने कदमला ८ हजार रुपये प्रतिग्रॅमने २५ ग्रॅम विष विकून २ लाख रुपये मिळविले होते. या डॉक्टरने हे विष उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथील कंपन्यांना विकले होते. खारगेला कोब्रा व घोणस पुरविणारे आणखी दोन सर्पमित्र सांगली येथील असून ते अद्याप फरार आहेत. पोलीस निरीक्षक मितेश घट्टे व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.