शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाई न झाल्यास ठेकेदारांची बिले रोखणार

By admin | Updated: June 24, 2017 06:06 IST

शहरातील नालेसफाईची कामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शहरातील नालेसफाईची कामे प्रशासनाकडून युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या कामांची तपासणीही केली जात आहे. यामध्ये कामे व्यवस्थित झाली नसल्याचे आढळून आल्यास संबंधित ठेकेदारांची बिले रोखण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी शुक्रवारी मुख्य सभेला दिली.शहरात मागील आठवड्यात झालेल्या पहिल्याच पावसाने मोठी दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले. शुक्रवारी मुख्य सभेला सुरुवात होताच नगरसेवकांनी नालेसफाईचा प्रश्न उपस्थित केला. पावसाळ्याच्या पूर्वी शहरात करण्यात आलेली नालेसफाई अत्यंत निराशाजनक असल्याची टीका या वेळी नगरसेवकांनी केली. पाऊस येण्याआधी शहरात असणाऱ्या सर्व नाल्यांची दरवर्षी साफसफाई केली जाते. यंदा मात्र ७० टक्के कमी रकमेने निविदा भरण्यात आली होती. त्यामुळे एवढ्या कमी रकमेत काम घेऊन ठेकेदाराने काहीही काम केले नसल्याचा आरोप सभासदांनी केला. प्रेरणा देशभ्रतार यांनी खुलासा केला.त्या म्हणाल्या, ‘‘शहरातील पाचही परिमंडळांच्या नालेसफाईचा अहवाल मागविण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या विभागांचे काम झालेल्या ठिकाणांची फेरतपासणी करण्यात येत आहे.’’अद्यापही कामे ठप्पच पाऊस झाल्यास पाणी तुंबणार1राष्ट्रवादीचे दिलीप बराटे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. प्रशासनाने नालेसफाई केली नसून याला कोण जबाबदार, अशी विचारणा त्यांनी केली. दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी, प्रशासन अजूनही ढिम्म आहे, काहीही काम केले नसून पुन्हा पाऊस झाला तर पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले. 2नगरसेविका वृषाली चौधरी यांनी कर्वेनगर उड्डाणपुलाचा राडारोडा साचून काकडे सिटी भागात पाणी साचत असल्याची तक्रार केली. बापूराव कर्णे गुरुजी यांनी नालेसफाई अजिबात झाली नसून दुभाजक काढून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी केली.