राजाराम मधुकर खाडे (खाडे वस्ती, लाकडी, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लाकडी या ठिकाणी आरोपीने स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी लिक्विड पाराफिन व व्हे पावडर पदार्थाची दुधामध्ये भेसळ करून भेसळयुक्त दूध घातक असल्याचे माहित असताना त्याची विक्री केली. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारीसह आयुक्त कार्यालय पुणे सुलिंद्र शहाजीराय क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. गुन्ह्यांमध्ये गायीचे दूध ३ कॅन (११८ लिटर) - किंमत २७१४ रुपये, व्हे पावडर (गोवर्धन) - १० बॅग (२४८ किलो) - किंमत २८ हजार ७६८ रुपये, लिक्विड पाराफिन - १ बॅरल (२८ लिटर) किंमत ३ हजार २२० रुपये असा ३४ हजार ७०२ रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितिन लकडे हे करत आहेत.
लाकडीत दुधात भेसळ केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:13 IST