शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे खोदकाम; वाहतुकीचे तीनतेरा

By admin | Updated: March 4, 2016 00:52 IST

समोरचा रस्ता खोदलेला, डाव्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू, उजव्या बाजूच्या रस्त्यावर डांबरीकरण चाललेले, परंतु मागे वळावे तर एकेरी वाहतुकीचा नियम तोडल्याची भीती, करावे तर काय करावे

पुणे : समोरचा रस्ता खोदलेला, डाव्या बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू, उजव्या बाजूच्या रस्त्यावर डांबरीकरण चाललेले, परंतु मागे वळावे तर एकेरी वाहतुकीचा नियम तोडल्याची भीती, करावे तर काय करावे, पुणेकर नागरिकांसमोर असा गहण प्रश्न सध्या महापालिकेने निर्माण केला आहे. या सर्व खात्यांमध्ये आॅनपेपर चांगला समन्वय आहे, प्रत्यक्षात मात्र त्यांनीच सर्वांनी मिळून शहरातील बहुतेक रस्त्यांचे बारा वाजवले आहेत.मार्च अखेरमुळे पालिकेतील सर्वच माननीयांना आपापल्या मतदारांची एकदम काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे एकाच वेळी गल्ली, बोळ, मोठ्या रस्त्यांना जोडणारे लहान रस्ते यांची कामे सुरू झाली आहेत. रस्ता खोदायचा व अनेक दिवस तसाच ठेवायचा, अशी पद्धत सुरू आहे. कामगार, रस्तेखोदाई करणारी यंत्रे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची, पहिले काम तसेच सोडून द्यायचे, कामगार मिळाले की, ते सुरू करायचे, तोपर्यंत दुसऱ्या रस्त्याची खोदाई सुरू करायची, असा प्रकार शहरात अनेक ठिकाणी सुरू आहे.आॅनपेपर एकदम आदर्श असणाऱ्या या रचनेचे तीनही यंत्रणांनी मिळून कसे बारा वाजवले आहेत, ते शहरात सर्वत्र रोज दिसत आहे. समन्वय नाही, नियोजन नाही अशा पद्धतीने सुरू असलेल्या या रस्ते खोदाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहनचालकांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. शिवाय, त्या त्या परिसरातील नागरिकही कामाला होत असणाऱ्या विलंबामुळे वैतागले आहेत. काँक्रिटीकरण असेल तर रस्ता बराच खोल खोदला जातो, त्यावरून वाहन चालवताच येत नाही, डांबरीकरण असेल, तर रस्त्याच्या वरचा लेअर खरवडून काढला जातो, त्यावरून चालवले की वाहन एक तर घसरते किंवा टायर पंक्चर तरी होते. नागरिकांची मागणी नसतानाही माननियांच्या आग्रहातून ही कामे सुरू आहेत. (प्रतिनिधी)रस्ता खोदायचा असेल, तर त्याआधी पालिकेने वाहतूक शाखेची परवानगी घ्यावी, असा नियम आहे. ठेकेदारालाही वाहतूक शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहतुकीला अडथळा होणार नाही, रस्ताखोदाई सुरू असताना, तिथे वाहतूक नियोजनासाठी दोन कामगार ठेवायचे, खोदलेल्या रस्त्याच्या बाजूने कापडी सुरक्षा चौकटी लावाव्यात, दिलेल्या मुदतीत रस्त्याचे काम पूर्ण करावे, वाहतूक जास्त असेल तर काम रात्री करावे, असे अनेक नियम वाहतूक शाखेच्या ना हरकत प्रमाणपत्रात आहेत. त्याचे पालन करेन, असे लिहून दिल्यानंतरच ठेकेदाराला विशिष्ट मुदतीचे ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.वाहतूक शाखा अशा कामांना ना हरकत प्रमाणपत्र देते. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होत नाही, हे खरे आहे. त्यामुळे आम्ही आता वाहतुकीला अडथळा आणला म्हणून ठेकेदारांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे.- सारंग आव्हाड, उपायुक्त, वाहतूक शाखारस्ता खोदण्यापूर्वी आम्ही त्याची कल्पना वाहतूक शाखेला देत असतो. सध्या एकाच वेळी अनेक कामे सुरू आहेत, त्यामुळे अडचण होत असेल. ठेकेदारांना सांगून त्यात नियोजन आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.- राजेंद्र राऊत, उपायुक्त, पथ विभाग, महापालिका