शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यंगचित्रकार देशद्रोही कसे?

By admin | Updated: December 23, 2016 01:00 IST

‘देशाची व्यवस्था बिघडविणारे ते देशभक्त आणि त्या बिघडलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार मात्र देशद्रोही कसे?’

पुणे : ‘देशाची व्यवस्था बिघडविणारे ते देशभक्त आणि त्या बिघडलेल्या व्यवस्थेवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार मात्र देशद्रोही कसे?’ असा सवाल ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी उपस्थित केला.साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित मासिक मनोरंजन‘कार’ का. र. मित्र व्याख्यानमालेत ‘व्यंगचित्रे आणि विनोद’ या विषयावर ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी व्यासपीठावर होते.तेंडुलकर म्हणाले, ‘‘इतर सर्व कला उस्फूर्त आहेत. व्यंगचित्र मात्र प्रतिक्रियेतून जन्माला येते. लेखकाला टोपणनाव घेऊन लेखनाच्या मागे लपता येते, तसे व्यंगचित्रकाराला त्याच्या व्यंगचित्रामागे लपता येत नाही. व्यंगचित्र हीच त्याची ओळख बनते. व्यंगचित्रे आणि त्यांतील आशय समजण्याएवढी प्रगल्भता सुशिक्षित म्हटल्या जाणाऱ्या समाजाकडे आजही नाही. त्यामुळेच व्यंगचित्रांमुळे वादळे निर्माण होतात. कधी सरकारची, कधी धर्माची तर कधी जातीची बंधने व्यंगचित्रकारांवर येत आहेत ही चिंतेची बाब आहे. कलाकाराला कोणत्याही कप्प्यात बंदिस्त करणे योग्य नाही.’’प्रा. जोशी म्हणाले, ‘‘सूक्ष्म निरीक्षणशक्तीबरोबरच तरल संवेदनशीलता आणि विनोदबुद्धी व्यंगचित्रकाराकडे असावी लागते. चित्रकाराबरोबरच विनोदकाराचे कसबही व्यंगचित्रकाराकडे असावे लागते. जीवनातील विकृती आणि विसंगतीकडे दयाबुद्धीने पाहण्याची दृष्टी असावी लागते. रंजनाबरोबरच डोळ्यांत अंजन घालण्याचे काम व्यंगचित्रकार करीत असतात.’’दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)