शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

करिअर गणितातील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:10 IST

गणित विषयाला शुद्ध आणि उपयोजित अशा दोन्ही बाजू आहेत. गणिताला स्वत:चे असे एक विश्व असून त्याकडे विज्ञान,अभियांत्रिकी व इतर ...

गणित विषयाला शुद्ध आणि उपयोजित अशा दोन्ही बाजू आहेत. गणिताला स्वत:चे असे एक विश्व असून त्याकडे विज्ञान,अभियांत्रिकी व इतर उपयोजित शाखांची परिभाषा म्हणूनही पाहता येते. त्यामुळेच गणित हा मुख्य विषय घेतल्यानंतर विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होतात. याबाबतच या लेखात आढावा घेतला आहे.

कला व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये गणित हा मुख्य विषय घेऊन पदवी प्राप्त करता येते. गणिताची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीजगणित, भूमिती, अंकगणित, गणितीय विश्लेषण या गणितातील पारंपरिक शाखांबरोबरच संगणकशास्त्राशी निगडित असे डिसक्टेट मॅथेमॅटिक्स, तसेच उपयोजित गणिताशी निगडित मॅथेमॅटिकल फायनान्स, आॅप्टिमायजेशन टेक्निक्स, न्युमरिकल अ‍ॅनालिसीस, डाटा सायन्स असे विषय जरूर शिकावेत. त्याचप्रमाणे पदवीचे शिक्षण घेत असतानाच काही संगणकीय कौशल्ये आत्मसात करून घ्यावीत. त्याचप्रमाणे पदार्थविज्ञान (फिजिक्स) व संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक) हे विषय दुय्यम स्तरावर घेतल्यास गणितासाठी अतिशय पूरक ठरतात.

पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट अशा क्षमता निर्माण होतात. त्यात विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे, तात्त्विक स्पष्टीकरण देणे, माहितीची सांगड घालणे, त्यातील सामायिक धागा शोधून अंदाज वर्तवणे आदी क्षमतांचा समावेश करता येईल. या क्षमतांचा वापर आणि विकास करून विद्यार्थी गणित विषयात उत्तम करिअर करु शकतात .

अध्यापन क्षेत्र : शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे या स्तरांवर गणिताचे उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या अध्यापकांची मोठी गरज आहे. शाळेत शिकवण्यासाठी बी. एड, महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच नेट/सेट परीक्षा व विद्यापीठ स्तरावर प्राधान्याने पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेणे आवश्यक आहे. गणितामध्ये रस निर्माण करणे व गणिती क्षमता उत्तम असणारी पिढी घडवणे, असे मोठे कार्य या माध्यमातून करता येते.

संशोधन क्षेत्र : गणितामध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतर विषयांच्या तुलनेने खूपच कमी असते. कोणत्याही प्रयोगशाळेचा वापर न करता केवळ नियतकालिके, चर्चा व व्याख्यानांच्या आधारे संशोधन करणे हे खूपच कठीण व चिकाटीचे काम आहे. संशोधनाला सुरवात करण्यापूर्वी उत्तम दर्जाचे पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संस्था

१) आयआयटी अथवा एनआयटी मध्ये एम.एस्सी.ला प्रवेश घेण्यासाठी जॉईंट अ‍ॅडमिशन फॉर मास्टर्स (जॅम) परीक्षा द्यावी लागते.

२) चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट (सीएमआय) मध्ये प्रवेश पूर्व परीक्षा देऊन डेटा सायन्स या विषयासाठी एम.एस्सी.ला प्रवेश घेता येतो.

३) फायनांसियल मॅथेमॅटिकल हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथे शिकवला जातो.

४) पुण्यातील गोखले इन्स्टिटयूट मध्ये एम.एससी.फायनांसियल इकोनॉमिक्स अभ्यासक्रम पूर्ण करून करिअर करता येते.

५) इंडियन सॅस्टिकल इन्स्टिट्यूटमधील पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रम निवडता येतात.

६) टीआयएफआर, आयआयएससी, आयआयएसईआर, आयजीआयडीआर अशा दर्जेदार राष्ट्रीय पातळीवरील संस्थांमध्ये पदवी, पदव्युत्तर अथवा संशोधनात्मक (पीएच.डी.) चे शिक्षण घेता येते.

७) भारताबाहेरील अनेक विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर व संशोधनात्मक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. अमेरिकेतील विद्यापीठांमधील प्रवेशासाठी भारतातील ४ वर्षांचे पदवी शिक्षण घेणे आवश्यक आहे.

सर्व संस्थांची माहिती, तसेच प्रवेश चाचण्यांचे वेळापत्रक त्या-त्या संस्थांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाते. विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासूनच सर्व संकेतस्थळांना भेट देऊन प्रवेश परीक्षांचा अभ्यास व नियोजन चालू करावे.

खाजगी उद्योग क्षेत्र : गेल्या काही वर्षांपासून खाजगी उद्योग क्षेत्रात गणितातील पदवीधारकांना प्रचंड मागणी आहे. विषेशत: संगणक क्षेत्रातील व्यवसायांमध्ये काही संगणकीय क्षमता व गणिताची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रमाने चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते.

१) संगणकप्रणाली निर्माण करण्याच्या स्तरावर अथवा गणितीय प्रारूप करण्याच्या स्तरावर (मॅथेमॅटिकल मॉडेलिंग) बहुतांशी सर्व खाजगी उद्योगसमूहांना गणितातील पदवीधरांची निकड असते.

२) सिनेक्षेत्र, जाहिरात क्षेत्र, क्रीडा क्षेत्र यांमध्ये ही संगणकीय प्रतिकृती (कॉम्प्युटर सिम्युलेशन) करण्यासाठी गणितीय ज्ञानाची आवश्यकता असते.

३) नव्या अर्थरचनेमध्ये जोमाने वाढीस लागलेली एक शाखा म्हणजे मॅथेमॅटिकल फायनान्स. मार्केटमधील उलाढालीचा अभ्यास करून वैयक्तिक गुंतवणूकदारांना अथवा वित्तीय कंपन्यांना सल्ला पुरवण्याचा व्यवसाय खूपच आकर्षक आहे.

४) सरकारी विज्ञानविषयक प्रयोगशाळा व संस्था : अनेक सरकारी विज्ञानविषयक संस्थांमधे गणितातील पदवीधरांना नोकरीची संधी मिळू शकते.

गणित हा अतिशय मूलभूत आणि सर्वव्यापी विषय आहे. त्यामुळे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या पदवीधरांना अक्षरश: अमर्याद संधी आहेत. त्यासाठी पदवी घेताना गणिताचा पाय भक्कम करणे, संगणकीय क्षमता वाढवत रहाणे व आपली आवड ओळखून शुद्ध व उपयोजित गणितातील योग्य पयार्यांची निवड करणे महत्वाचे ठरेल.

-डॉ. वि. मा. सोलापूरकर, विभाग प्रमुख, गणित विभाग, स. प. महाविद्यालय,