शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

ध्वनिप्रदूषणामुळे होतो हृदयरोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 05:25 IST

ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक ताण, उच्च रक्तदाब, हृदयरोगास आमंत्रण, बहिरेपणा, वृद्ध व लहान मुलांमध्ये घबराट, नैराश्य असे दुष्परिणाम होतात

पुणे : ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक ताण, उच्च रक्तदाब, हृदयरोगास आमंत्रण, बहिरेपणा, वृद्ध व लहान मुलांमध्ये घबराट, नैराश्य असे दुष्परिणाम होतात. ते टाळण्यासाठी पालकांनी मुलांना वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान द्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी उपस्थितांना केले.भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्रात ते बोलत होते. बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, की पुणे शहर स्मार्ट सिटी होत असताना ते शांत शहर झाले पाहिजे, मोठे शहर म्हणजे मोठा कोलाहल हे योग्य नव्हे.सहस्रबुद्धे या सायलेंट सिटीबाबत जागृती करणाºया पहिल्या लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घ्यावेत, असे राऊत म्हणाले.पुणे शहर ‘सायलेंट सिटी’ बनण्यासाठी तुम्ही सर्वांनी ‘सदिच्छादूत’ बना. हॉर्न वाजवायचा नाही, हे सुरुवातीला अवघड जाईल मात्र प्रयत्नांनी जमेल. मग तुमचा प्रवास तणावमुक्त होईल. नियमांचे पालन केल्यास वाहन चालविणे सुरक्षित होते, असे त्यांनी पालकांना सांगितले.जो पाळतो सर्व नियम, तोच खरा सिंघम, असे त्यांनी मुलांना सांगितले. राऊत यांनी मुलांना अनेक प्रश्न विचारले. बरोबर उत्तरांसाठी मुलांना काकांकडून खाऊ मिळाला. चित्रमय स्लाईड्समुळे कार्यक्रमाची रंगत वाढली.राऊत म्हणाले, की सर्वसाधारण व्यक्ती वयाच्या २० ते ६० वर्षे म्हणजेच सरासरी ४० वर्षे वाहन चालविते. रोज १० वेळा, महिन्यात ३०० वेळा म्हणजे वर्षाला १ लाख वेळा हॉर्न वाजवते. आता १०० लोकांनी हॉर्न न वाजविण्याचा संकल्प केला तर पुढील एक वर्षात पुण्यात रस्त्यावरील १ कोटी आवाज कमी होतील.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद राठी म्हणाले, की हॉर्न वाजविल्याने केवळ कानांनाच इजा होत नाही, तर आपली प्रतिकारशक्तीही कमी होते. सहस्रबुद्धे यांनी ही मोहीम पुढे न्यावी, असे आवाहन केले.ध्वनिप्रदूषणाच्याविरोधात काम करण्यात अग्रेसर असलेले डॉ. यशवंत ओक या वेळी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गेल्या चाळीस वर्षांत एकदाही हॉर्न न वाजविलेले श्रीराम सहस्रबुद्धे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व मुले व पालकांनी हॉर्न न वाजविण्याची शपथ घेतली.