शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गाडीला पोलिसी लॉक; वाहनचालकही ‘ब्लॉक’

By admin | Updated: December 28, 2015 01:21 IST

चारचाकी वाहने बिनधास्त रस्त्यावर पार्किंग करा, असा नवा फंडा रुजला होता. वाहतूक पोलीस दुचाकी वाहने बिनधास्तपणे उचलून नेली जात होती.

पिंपरी : चारचाकी वाहने बिनधास्त रस्त्यावर पार्किंग करा, असा नवा फंडा रुजला होता. वाहतूक पोलीस दुचाकी वाहने बिनधास्तपणे उचलून नेली जात होती. पण, चारचाकी वाहनांना कोणी हातच लावत नव्हते, अशी एक समजूत झाली होती. पण, शनिवारी वाहतूक पोलिसांनी चारचाकी वाहनांना जॅमर लावून कारवाई केली अन् वाहनचालकांची पळापळ उडाली. निगडी प्राधिकरणातील विविध अंतर्गत रस्त्यांवर व मुख्य रस्त्यांवरील नो पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांवर निगडी शाखेच्या वाहतूक विभागामार्फत कारवाई करण्यात आली. १४ डिसेंबरपासून ही कारवाई सुरू असून, आत्तापर्यंत ७८ वाहनांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागांमधील रहिवाशांनी केलेल्या तक्रारींमुळे पोलीस आयुक्तांनी नो पार्किंगमध्ये रस्त्यावर उभ्या असणाऱ्या, वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या, पदपथावर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार निगडीच्या वाहतूक शाखेच्या वतीने प्राधिकरणातील पेठ क्रमांक २६, २७, २८, निगडीतील मुख्य रस्त्यांवर, भक्ती-शक्ती चौक परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वाहनांना जॅमर लावण्यात आले. ब्लॅक फिल्मिंग असणे, विनापरवाना वाहन चालवणे अशा गुन्ह्यांनुसार दंड वसूल करण्यात आला. वाहनांच्या मालकांकडून सर्व कागदपत्रांची तपासणी केली. यामध्ये १४ ते २० डिसेंबरदरम्यान ५३ वाहनांवर, तर २१ ते २६ डिसेंबरपर्यंत २५ वाहनांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग बी. मुदीराज यांच्या अंतर्गत करण्यात आली. नो पार्किंगमधील वाहनांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक हवालदारास अरेरावी करून शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी निगडी येथे घडला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगणक अभियंता अमरजीत सूर्यवंशी (वय ३०) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)