शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

VIDEO: नियंत्रण सुटल्यानं कार कालव्यात पडली; तीन चिमुकल्यांसह पती-पत्नीची सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 19:10 IST

राजगुरुनगरमध्ये कारला अपघात; चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात कोसळली कार

राजगुरुनगर: सातकरस्थळ (पूर्व) (ता. खेड) येथे चारचाकी वाहनचालकांचे नियत्रंण सुटल्यामुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात चारचाकी पडली दरम्यान स्थानिक तरुणांच्या वेळीच कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह पती पत्नी सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, होलेवाडी (ता खेड ) गुरुदेव साम्राज्य येथे वास्तव्य असलेले प्राथमिक शिक्षक गणेश मगर आपल्या मारुती बलेनो कारमधून (क्र. एम एच १४ ..५०२७) पत्नी, त्यांचा एक आणि शेजारील दोन मुले अश्या पाचजनांसह काळेवाडी, ता. खेड परिसरात असलेल्या सौरंग्या डोंगरावरील दत्त मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परत येताना दुपारी एकच्या सुमारास सातकरस्थळ येथील चासकमान डाव्या कालव्याच्या पुलावरून वळण घेताना त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग लॉक होऊन आहे. त्या वेगात जागेवर वळण घेऊन ती थेट कालव्याच्या प्रवाहात जाऊन पाण्यावर तरंगू लागली. अशाही स्थितीत चालक असलेल्या गणेश मगर यांनी सतर्कतेने खिडकीच्या काचेतून पाण्यात उडी मारली. त्याच खिडकीला धरून गाडी ओढून कडेला नेत मदतीसाठी आरडाओरडा केला.  कालव्याजवळ असलेल्या महिलांनी आवाज ऐकून त्यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना हाक दिली तत्काळ तुषार सातकर, स्वप्नील सातकर, अशोक सातकर, संदीप सातकर, विशाल सातकर या युवकांनी पाण्यात उड्या मारल्या. गाडी तरंगत प्रवाहात वाहात चालली होती आणि गाडीतील महिला आणि मुले जिवाच्या आकांताने ओरडत होती. पाण्यात उड्या मारलेल्या युवकांनी गाडीचे दरवाजे बाहेरून उघडले. आतील मुलांना व महिलेला घाईघाईने बाहेर काढले. त्यांना कालव्याच्या काठाला आणले. दरम्यान गाडीत पाणी शिरून गाडी बुडाली होती. वेळेत सर्वांना बाहेर काढल्याने पाच जणांचा जीव वाचला. एक तासानंतर क्रेनच्या साहाय्याने बुडालेली कार काढण्यात आली असे सुनील सातकर यांनी सांगितले. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात चारचाकी पडल्यावर ही गाडी तरंगत असतानाच आजूबाजूला असलेल्या युवकांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेऊन गाडीतील पाच जणांना बाहेर काढल्याने युवकांच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे.