शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्तृत्ववान महिलांनी निर्माण केले स्वतःचे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:10 IST

सरस्वती शेंडगे यांचे मत : तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांचा सन्मान लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान ...

सरस्वती शेंडगे यांचे मत : तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, किरण बेदी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांमुळे समाजात स्त्रियांचे वेगळे स्थान निर्माण झाले. चूल-मूल सांभाळत या स्त्रियांनी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. त्यांचा प्रत्येक महिलेने आदर्श घ्यावा, असे मत उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी व्यक्त केले.

तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात करण्यात आले होते. यावेळी जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. मधुरा कसबेकर, संचालिका अ‍ॅड. गौरी कुंभोजकर, नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे, मृणाली रासने, वैशाली खटावकर, स्वप्नाली पंडित, सुनीता चौहान, दीक्षा माने, विशाखा पवार, चंद्रमा भंडारी, हिना साखरिया, रोहिणी हांडे, स्वाती ओतारी, अभिनेत्री वाळके, मनाली देसाई आदी उपस्थित होते.

महिला व्यावसायिक लता हगवणे, वर्षा ढमाले, रोहिणी इंगळे, डिंपल ठक्कर, वंदना ललवाणी, उज्वला कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. शाल, फळांची परडी, मोत्याची माळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.