शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

उमेदवारांची झाली दमछाक

By admin | Updated: February 22, 2017 03:09 IST

कितीही जनजागृती केली, मतदारांना स्क्रॅचकार्ड वाटले, तरीसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढत नाही

हडपसर : कितीही जनजागृती केली, मतदारांना स्क्रॅचकार्ड वाटले, तरीसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढत नाही. सकाळपासून मतदार सवड मिळेल तेव्हा आपला हक्क बजावून जात होता. कडक बंदोबस्त, सर्व पक्षांचे बूथ, अपक्ष उमेदवार एकाकी उभा, असलेले चित्र आज सर्व मतदान केंद्रांवर पाहण्यास मिळाले. प्रभाग क्र. २१ मध्ये ५५ टक्के एवढे मतदान झाले. प्रभाग क्र. २२ मध्ये ५८.६३ टक्के, प्रभाग क्र. २३ मध्ये ५९.१७ एवढे मतदान झाले चार उमेदवारांचा प्रभाग असल्याने चार भागांतील बूथवर फिरून प्रत्येक उमेदवाराची दमछाक झाली. मतदार याद्या कितीही दुरुस्त केल्या, तरी मतदारांचे हाल झाले. माळवाडी-मुंढवा प्रभागातील २५० ते ३०० मतदार सातववाडी प्रभागात, तर सातववाडी प्रभागातील माळवाडी ४०० ते ४५० मतदार गेल्याच्या तक्रारी मतदार करीत होते. पहिल्या टप्प्यात सकाळी ९.३० वाजता ७ ते १२ टक्के मतदान झाले. दुपारी ११.३० वाजेपर्यंत सुमारे २० टक्के मतदान झाले. दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हाचा कडाका वाढल्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली. रामटेकडी-वैदूवाडी भागात मात्र दुपारी १.३० पर्यंत अवघे ७ टक्के मतदान झाले होते, काही कें द्रांवर ३२ ते ३५ टक्के मतदान १.३० पर्यंत झाले, तर ३.३० वाजता ४० ते ४२ टक्के मतदान झाले, मात्र दुपारनंतर अनेक कंपन्यांनी अर्धी सुटी दिल्यामुळे कामगारवर्गाच्या मतदानाचा टक्का वाढला. कडक उन्हामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहसुद्धा कमी होत असल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची टक्केवारी अपेक्षित झाली नसल्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून उमेदवार आणि कार्यकर्त्यांची धावपळ पूर्णपणे शांत झाली. पोलीस बंदोबस्त कडक असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.(वार्ताहर)उमेदवारांचे चिन्ह शोधताना मतदारांची कसरत मतदान केंद्रावर एकापेक्षा जास्त यंत्र असल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाला. अशिक्षित मतदारांबरोबर साक्षर मतदारांनाही मतदान करताना अडचणी आल्या. एकाच वेळी चार उमेदवारांना मतदान करण्याची मतदारांची ही पहिलीच वेळ होती. अ, ब, क आणि ड अशा चार उमेदवारांसाठी रंगही वेगवेगळे होते; मात्र उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे मतदारांना नाव आणि चिन्ह शोधताना कसरत करावी लागली. त्या वेळी अधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर, मतदान प्रक्रिया करता आली.  काही केंद्रांवर उमेदवारांच्या माहितीचे फलक नव्हते, केंद्रातील खोल्यात मतदानाची टक्केवारी लिहिण्यासाठी बोर्ड नव्हते. तर, केंद्रावरील अधिकारी व्हॉट्सअ‍ॅपवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना आकडेवारी पाठवत होते. मात्र, टक्के वारी काढण्याकडे दुर्लक्ष केले जात होते.