पुणे : महापालिका निवडणुकांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. हातामध्ये प्रचारासाठी कमी कालावधी राहिल्यामुळे मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी उमेदवारांनी नवीन शक्कल लढवली आहे. सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गाठून उमेदवार मतदानाचे ‘अपील’ करीत आहेत. त्यामुळे प्रचाराच्या धामधुमीत उमेदवारांचेही मॉर्निंग वॉक घडू लागले आहे. शहरामध्ये पर्वती, तळजाई, हनुमान, वेताळ आदी टेकड्यांसह सारसबाग, संभाजी उद्यान, ताथवडे उद्यान अशा मोठ्या उद्यानांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रभात फेरी मारण्यासाठी जातात. यासोबतच शहरातील जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे हास्य क्लब भरतात. सकाळी प्रसन्न वातावरणामध्ये नागरिक थोडे ‘रिलॅक्स’ असतात. त्यांना घाईगडबड नसते. त्यामुळे उमेदवारांनी आपापल्या भागातील मॉर्निंग वॉकची ठिकाणे हेरली आहेत. या ठिकाणांवर सकाळीच धडक मारून मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
प्रचारासाठी उमेदवारांचेही ‘मॉर्निंग वॉक’
By admin | Updated: February 15, 2017 02:21 IST