शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे ‘जागते रहो!’

By admin | Updated: October 15, 2014 05:37 IST

सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आचारसहितेमुळे मंगळवारी उघड प्रचार होत नसला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता

पिंपरी : सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आचारसहितेमुळे मंगळवारी उघड प्रचार होत नसला, तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू होता. शेवटच्या सत्रात आपण कोठे कमी पडू नये, यासाठी डोळ्यात तेल घालून रात्र जागवली गेली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नही उमेदवारांनी अजमावले. या वेळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडी आणि महायुती तुटली आहे. त्यामुळे मतविभागणी होण्याची शक्यता आहे. अर्ज भरल्यापासून सर्वच उमेदवारांनी आपली सर्व ताकत पणाला लावून प्रचार केला. मतदानाआधीचा हा दिवस सगळ्यांसाठीच वैऱ्याची रात्र आहे. प्रचारामध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता पूर्णपणे प्रचार केल्यानंतर आता शेवटचा दिवस व शेवटची रात्र ही निर्णायक रात्र आहे. म्हणून सर्वच पक्षांची नेतेमंडळी, उमेदवार, कार्यकर्ते मैदानात उतरलेले दिसले. सकाळपासूनच प्रत्येकजण कामात असल्याचे दिसत होते. गुप्त बैठका आणि मतदारांना अनेक प्रलोभने देण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. उमेदवारांनी आपल्या निवडक कार्यकर्ते यांच्यावर विशिष्ट कामाची जबाबदारी सोपविली होती. प्रत्येक वार्डातील प्रत्येक प्रमुख कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होते. या वेळी आघाडी आणि युती फुटल्यामुळे मतांची फेर जुळवाजुळव करावी लागत आहे. आपला पारंपरिक मतदार आपल्यामागे उभा राहावा यासाठी प्रत्येक उमेदवार प्रचार करताना दिसला. शेवटचा दिवस व शेवटची रात्र ही मतदानासाठी निर्णायक ठरणारी असते. गुप्त पद्धतीने प्रचारावर भर दिला जात आहे. मतदारांचा अंदाज घेऊन कार्यकर्त्यांमार्फत मतदारांना वळवण्याचा शेवटचा प्रयत्न उमेदवार दिवसभर करीत होते. निवडणूक विभागाची करडी नजर सर्वच मतदारसंघात निवडणूक विभागाच्या निरिक्षकांनी फेरफटका मारून पाहणी सुरू होती. पोलिसांचे विशेष लक्ष होते. (प्रतिनिधी)