पुणो : हडपसर विधानसभा संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार महादेव बाबर यांच्याकडे तब्बल 48 कोटी 1क् लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रतून ही माहिती समोर आली आहे. माजी महापौर वैशाली बनकर यादेखील कोटय़धीश असून, त्यांच्या नावे सव्वा कोटींची मालमत्ता आहे.
आमदारांकडे 1 लाख दहा हजार रुपयांची रोकड असून, पत्नीकडे रोख रक्कम काहीच नाही. याशिवाय बाबर पती-पत्नीच्या नावे तब्बल 36 वाहने आहेत. याशिवाय बाबर यांच्याकडे 1क् लाख 6क् हजार रुपये किमतीचे 35 तोळे सोने व 1.8 किलो चांदी असून, पत्नी स्मिता यांच्या नावे 14 लाख 8क् हजार रुपये किमतीचे 5क् तोळे सोने व 2 किलो चांदी आहे. बाबर यांच्या नावे 2 कोटी 22 लाख 55 हजार 237 रुपये, तर पत्नीच्या नावे 17 लाख 92 हजार 2क्क् रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रसिका धनंजय देसाई यांच्याकडे बँकेत 1 लाख 6 हजार 678 रुपये आहेत. (प्रतिनिधी)
4प्रमोद भानगिरे यांची मालमत्ता 81 लाख 58 हजार (जंगम), प}ीच्या नावे 4 लाख, तर स्थावर मालमत्ता 81 लाख 5क् हजार आहे. रोकड 28 लाख 45 हजार आहेत.
4बाळासाहेब शिवरकर यांची जंगम मालमत्ता 28 लाख 58 हजार, तर प}ीच्या नावे 8 लाख 67 हजार आहे. मुलीच्या नावे 5 लाख 4क् हजार आहे. तर, स्थावर मालमत्ता 1 कोटी 199 लाख 6 हजार आहे.
4चेतन तुपे यांची जंगम मालमत्ता 7 कोटी 55 लाख 49 हजार, तर प}ीच्या नावे 1 कोटी 67 लाख8क् हजार आहे.तर, स्थावर मालमत्ता 17 कोटी 71 लाख 18 हजार आहे. तर, प}ीच्या नावे 28 लाख 5क् हजार आहे. तर, बॅँकामध्ये ठेवी 3 कोटी 4क् लाखांच्या आहेत.
4योगेश टिळेकर यांची जंगम मालमत्ता 78 लाख 68 हजार, तर प}ीच्या नावे 2 लाख 65 हजार आहे.
4माजी महापौर वैशाली बनकर यांनीदेखील हडपसर येथून अर्ज भरला आहे. बनकर पती-पत्नीकडे 1 कोटी 24 लाख 45 हजार 59क् रुपयांची मालमत्ता आहे. त्यात 5क् हजार रुपयांची रोकड त्यांच्या नावे, तर पती सुनील यांच्याकडे 75 हजार रुपयांची रोकड आहे. तसेच, बनकर यांच्या नावे 8 लाख रुपयांचे 25 तोळे, तर पतीकडे 1 लाख 4क् हजार रुपयांचे 5 तोळे सोने आहे. वाहन व इतर जंगम मालमत्ता मिळून बनकर यांच्या नावे 22 लाख 27 हजार, तर पतीकडे 47 लाख 18 हजार 59क् रुपयांची मालमत्ता आहे.