शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पदयात्रा, भेटींवर उमेदवारांचा भर

By admin | Updated: February 16, 2017 03:31 IST

प्रभागरचनेमुळे मतदारसंघाचे वाढलेले क्षेत्र आणि मतदारसंख्या यामुळे उमेदवारांचा प्रचारात कस लागत आहे. चार उमेदवारांमुळे

पुणे : प्रभागरचनेमुळे मतदारसंघाचे वाढलेले क्षेत्र आणि मतदारसंख्या यामुळे उमेदवारांचा प्रचारात कस लागत आहे. चार उमेदवारांमुळे निवडणुकीत चुरसही वाढल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. त्यासाठी नेत्यांच्या सभांपेक्षा पदयात्रा, रोड शो आणि वैयक्तिक भेटीगाठींवरच अधिक भर दिला जात आहे. मतदानाला केवळ पाच दिवस शिल्लक राहिल्याने शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला जोर आला आहे. प्रभाग रचनेमुळे मतदारांची संख्या वाढली असून क्षेत्रही मोठे झाले आहे. पूर्वी वॉर्डरचनेमुळे मर्यादित लोकसंख्या व क्षेत्रामुळे प्रचार करण्यास फारसे कठीण जात नव्हते. आता प्रभागांमुळे चारही उमेदवारांना एकत्रित प्रचार करताना दमछाक होत आहे. असे असले तरी बहुतेक पक्षांंच्या उमेदवारांनी पदयात्रा आणि थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. प्रचार संपण्यास सात-आठ दिवस राहिल्यानंतर प्रमुख पक्षांच्या सभांना सुरुवात झाली. मात्र, याचे प्रमाणही खूप कमी असून आतापर्यंत मोजक्याच बड्या नेत्यांच्या सभा झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ‘एमआयएम’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभा झाल्या आहेत. त्यापैकी बहुतेक सभा उपनगरांमध्ये झाल्याचे दिसते. आता प्रचार संपण्यास केवळ चार दिवस उरले आहेत.