शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळांची मान्यता रद्द?

By admin | Updated: April 10, 2016 04:01 IST

आरटीई २५ टक्के प्रवेशास विरोध करणाऱ्या ११ शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. आरटीई नोंदणीसाठी शाळांना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती.

पिंपरी : आरटीई २५ टक्के प्रवेशास विरोध करणाऱ्या ११ शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. आरटीई नोंदणीसाठी शाळांना शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. आरटीई नोंदणी न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सूचित करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने प्रवेशास विलंब होत आहे.आरटीई थकीत फी परतावा न मिळाल्याने विरोध करणाऱ्या शाळांना आरटीई नियमाप्रमाणे प्रवेश नाकारता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालकाकडून यापूर्वी नोटिशीद्वारे सांगण्यात आले होते. तसेच शाळांना प्रवेश न देण्याचा खुलासाही मागविण्यात आला होता. इंग्रजी माध्यमाच्या या ११ शाळांमुळे आरटीई प्रवेश रखडला आहे. आरटीई थकीत परतावा देण्यात येणार असल्याचे सांगूनही शाळा दुर्लक्ष करीत आहेत.आरटीई प्रवेशास विरोध करणाऱ्या शाळांमध्ये एकूण ११ शाळांचा समावेश आहे. त्यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील, भोसरीतील प्रियदर्शनी इंग्लिश मीडिअम स्कूल, प्रियदर्शिनी सीबीएसई हायस्कूल, प्रियदर्शिनी प्राथमिक स्कूल, प्रियदर्शिनी सीबीएसई इंद्रायणीनगर, पिंपळे-गुरव वेदांत इंग्रजी मीडिअम स्कूल, सांगवीतील नॅशनल इंग्रजी मीडिअम स्कूल, पिंपरी डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, चऱ्होली डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, वाल्हेकरवाडी मातृ विद्यालय, चिंचवड येथील इस्टेकिंग स्टोन, भोसरीतील बी. कॉन स्कूल या शाळांनी आरटीई प्रवेशास विरोध केला आहे.डॉ. डी. वाय. पाटील शाळेने इयत्ता पहिली व आठवीचे वर्ग बंद केले आहेत. शिक्षण संचालक, उपसंचालक तसेच आयुक्त यांनाही जिल्हा परिषद, पुणे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)आरटीई कायदा आहे की, तोंड दाबून बुक्क्यांचा मारा हेच समजत नाही. आरटीई परतावा वेळेत दिला जात नाही. एकूण २६ शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही. तसेच एका विद्यार्थ्यांमागे प्रवेशासाठी दिले जाणारे शुल्क शाळांना न परवडणारे आहे.- राजेंद्र सिंग, सचिव, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनशाळा मान्यता रद्द होण्याचा अंतिम निर्णय शिक्षण उपसंचालक घेतील. मात्र, आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी होणे आवश्यक आहे. या शाळांसाठी प्रवेश रखडून ठेवला जाणार नाही. याचा निर्णय लवकरच होईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.- भाऊसाहेब कारेकर प्रशासन अधिकारी