शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

निविदा न काढताच सुरू केलेले काम अखेर रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:57 IST

कामाची निविदा न काढताच भवानी पेठ येथे सुरू करण्यात आलेले रस्त्यांचे काम अखेर रद्द करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशामुळे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी रोखली गेली

पुणे : कामाची निविदा न काढताच भवानी पेठ येथे सुरू करण्यात आलेले रस्त्यांचे काम अखेर रद्द करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आदेशामुळे पुणेकरांच्या पैशाची उधळपट्टी रोखली गेली खरी; पण आता खोदलेला रस्ता पूर्ववत कधी आणि कसा करणार हा मोठा प्रश्नच आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल. तसेच खोदलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी येणारा खर्चदेखील ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भवानी पेठ येथील एका रस्त्याचे काम निविदा प्रक्रिया न राबवताच सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे एकाच कामासाठी तीन निविदा काढण्यात आल्या असल्याचे समोर आले होते. भाजपाच्या नगरसेवकांनी ही कामे करण्यास सांगितली असल्याची बाब समोर आली आहे. हे प्रकरण उघड होताच प्रशासनाने आता या कामासाठी काढण्यात आलेल्या तीनही निविदा रद्द करून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला.याबाबत महापौर टिळक यांनी सांगितले की, रस्ता खोदूनठेवला असल्यामुळे नागरिकांनात्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. काम करण्यामध्ये सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. अशा गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यांनी कोणी रस्ता खोदला आहे, त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात येतील असे टिळक यांनी सांगितले.।संगममताने लूट होत असल्याचा आरोपमहापालिका प्रशासनाने हरीभाऊ गॅरेज परिसर काँक्रिटीकरण करणे १० लाख रुपयांचे काम, बापूसाहेब पवार कन्या शाळेमागील रस्ता काँक्रिटीकरण करणे २० लाख, रशिद शेख यांच्या निवासस्थानासमोरील रस्ता यूटीडब्ल्यू पद्धतीने विकसित करणे २० लाख, भवानी पेठ हाऊसिंग सोसायटी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे २० लाख, प्रभाग १९ ब मधील विविध विकासकामे करणे १५ लाख अशी १९ ब आणि क मधील कामे रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता पालिकेचे अधिकारी आणि राजकारणी यांच्या संगनमताने पालिकेची लूट होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.