पुणो: महाराष्ट्रामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) ची स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.मात्र,महाराष्ट्रातील कोणत्या शहराच्या वाट्याला ही संस्था येणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही,परंतु, पुण्यातच आयआयएम संस्थेची स्थापना व्हावी यादृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे पुण्याचे खासदार अनिल शोरोळे यांनी सांगितले.
खासदार अनिल शिरोळे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांची दिल्ली येथे भेट घेवून पुण्यात आयआयएम संस्थेची स्थापना करावी,असे निवेदन दिले होते.त्यामुळे नव्याने स्थापन केल्या जाणा-या पाच आयआयएम संस्थांपैकी महाराष्ट्राच्या वाटाल्या आलेल्या आयआयएम संस्थेची स्थापना कुठे होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर शिरोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,राज्यात पुण्यात आयआयएम संस्थेची स्थापना व्हावी या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ही संस्था पुण्यातच येईल, अशी आशा वाटते.