शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रेनकोट मिळतील का...?

By admin | Updated: July 25, 2016 02:32 IST

स्वेटर थंडीत हवेत; पण मिळतात उन्हाळ्यात...शालेय साहित्य शाळा सुरू होण्यापूर्वी हवे, पण मिळते दिवाळीच्या सुटीत... सायकली शाळेत जाण्यासाठी हव्यात;

सुनील राऊत,  पुणेस्वेटर थंडीत हवेत; पण मिळतात उन्हाळ्यात...शालेय साहित्य शाळा सुरू होण्यापूर्वी हवे, पण मिळते दिवाळीच्या सुटीत... सायकली शाळेत जाण्यासाठी हव्यात; पण मिळतात परीक्षा संपल्यावर. हा महापालिकेच्या शिक्षणमंडळाचा अजब कारभार पुणेकरांना नवीन नाही. या कारभाराची मालिका पावसाळ्यातील रेनकोटबाबतही सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिक्षण मंडळाकडून मे महिन्यापासून रेनकोट खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असली, तरी पावसाळ्याचे दोन महिने संपल्यानंतरही ही खरेदी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या वर्षी पावसाळा संपल्यानंतरच मुलांना रेनकोट मिळणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तब्बल २ कोटी रुपयांची ही रेनकोट खरेदी असून, त्यासाठी आत्तापर्यंत दोन वेळा निविदा मागविण्यात आल्या आहेत.मुलांना दर वर्षी वेळ निघून गेल्यानंतर, साहित्य मिळत असल्याने शिक्षण मंडळावर टीका होते. त्यामुळे या वर्षी मे २०१६ पासूनच रेनकोट खरेदीची प्रक्रिया सुरू केली असल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात येत आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत दोन वेळा निविदा मागविण्यात आल्याचे शिक्षण मंडळप्रमुख शुभांगी चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पहिल्यांदा ५ निविदाधारक आले होते. त्यातील सर्वांत कमी दर असलेल्या तीन पात्र झालेल्या निविदाधारकांनी सादर केलेले रेनकोट तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असता, ते शिक्षण मंडळाच्या निकषात बसले नाहीत. त्यामुळे पुन्हा निविदा मागविल्या होत्या. यात ११ जणांनी निविदा भरल्या असून, त्यातील ६ जण पात्र ठरले आहेत. मुलांची गैरसोयगेल्या काही वर्षांत शिक्षण मंडळाच्या खरेदी प्रक्रियेत होत असलेल्या गोंधळामुळे; तसेच भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे मंडळ चांगलेच चर्चेत आले आहे; मात्र या गोंधळाचा फटका थेट एक लाख विद्यार्थ्यांना बसत आहे. शालेय साहित्य वेळेत न मिळणे, गणवेश वेळेत न मिळणे, स्वेटर उन्हाळ्यात मिळणे, पावसाळा संपल्यानंतर, रेनकोट मिळणे, शालेय स्पर्धासाठी मुलांकडून प्रवासशुल्क वसूल करणे याचा थेट फटका मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. एका बाजूला पुणे शहर स्मार्ट सिटी स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकावर आले असताना नागरिकांना जलद, प्रभावी आणि सक्षम सेवा देण्याची हमी देणाऱ्या महापालिकेस आपल्याच शाळांमधील मुलांना शालेय साहित्य वेळेत देता येत नसल्याने मुलांची गैरसोय होत आहे.रेनकोट खरेदी अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या निविदेत आलेले रेनकोट निकषात बसत नसल्याने; तसेच निकृष्ट दर्जाचे असल्याने फेर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार या वेळी रेनकोट तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच रेनकोट कधी देता येतील, हे सांगता येईल. अहवाल चांगला असल्यास पुढील आठ दिवसांच्या आत रेनकोट उपलब्ध करून दिले जातील. - शुभांगी चव्हाण (शिक्षणप्रमुख)