शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव योजनेचा हिशोब द्या

By admin | Updated: May 11, 2017 04:11 IST

पिंपळगाव (ता. दौंड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत राजकारण करणाऱ्यांनी आधी तीन कोटींचा हिशेब द्यावा आणि मग राजकारण करावे

लोकमत न्यूज नेटवर्कराहू : पिंपळगाव (ता. दौंड) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत राजकारण करणाऱ्यांनी आधी तीन कोटींचा हिशेब द्यावा आणि मग राजकारण करावे, असे मत विद्यमान सरपंच रमेश कापरे यांनी व्यक्त केले.पिंपळगाव (ता. दौंड) येथील १ मे रोजी गणसंख्येअभावी तहकूब झालेली ग्रामसभा शुक्रवारी (दि. ५) विठ्ठल मंदिरात बोलावण्यात आली होती. या वेळी पाणीपुरवठा योजनेसह, वृक्षलागवड, निवडणुकात महिलांचा सहभाग, वार्षिक जमाखर्चाला मंजुरी देणे सन २०१७ ते २०१८ आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, रोजगार हमी, जिल्हा परिषदेच्या विविध योजना, स्वच्छ भारत मिशन चौदाव्या वित्त आयोग विकास आराखड्याला मान्यता देणे या व अशा अनेक विषयांवर साधकबाधक चर्चा झाली. परंतु, माटोबा तलावातून तीन कोटी २५ लाखांच्या जवळपास खर्च करून झालेल्या पाणीपुरवठा योजनेवरून सभा वादळी ठरली.पाणीपुरवठा योजना सुरळीत चालत नसून व गावात कमी दाबाने पाणी येत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सभास्थानी ग्रामस्थांतून बोलले जात होते. पिण्याच्या पाण्यासाठी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे शेवटी सांगितले. यावर उत्तर देताना पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगांबर कापरे यांनी पाणीपुरवठा योजना सुरळीत चालली असून, त्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा निर्वाळा सभेत दिला.यावर सरपंच रमेश कापरे म्हणाले, की योजना सुरळीत चालू आहे आणि त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, असे पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणत असतील, तर मग सव्वातीन कोटींचा हिशेब देऊन व योजना पूर्ण क्षमतेने चालून आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यास पाणीपुरवठा समितीने विलंब का केला? असा सवाल केला.पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष डिगांबर कापरे म्हणाले, की गेली १७ महिन्यांपासून ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहे व इस्टिमेटप्रमाणे सर्व कामे पूर्ण झाली आहेत. विरोधक राजकारण करीत आहेत. त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही. केलेल्या खर्चाचे लेखापरीक्षण पूर्ण झाले आहे.