शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कॅबचालकांना चारित्र्य पडताळणी बंधनकारक

By admin | Updated: May 10, 2017 04:08 IST

नयना पुजारीचे अपहरण आणि खून झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब चालकांची चारित्र्य पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नयना पुजारीचे अपहरण आणि खून झाल्यानंतर आयटी क्षेत्रातील अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅब चालकांची चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले होते. या घटनेनंतर चारित्र्य पडताळणी करून घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. सध्या कोणत्याही कॅब चालकाला ही प्रकिया पार पाडावीच लागते. कॅबमध्ये या चालकांचे नाव, छायाचित्र आणि मोबाईल क्रमांक असलेले ओळखपत्र लावणेही बंधनकारक आहे. पुण्यात हिंजवडी, खराडी, चंदननगर, कल्याणीनगर आदी भागांत आयटी कंपन्या आल्यानंतर अभियंत्यांच्या प्रवासासाठी विविध एजन्सीजकडून तसेच खासगी कॅब करारनामे करून घेण्यात आले. या कॅबवरील चालकांचे ग्रामीण भागातील प्रमाण अधिक होते. कॅबवरील चालकांकडून अशा प्रकारचे कृत्य घडू शकेल अशी कोणी कल्पना केलेली नसल्यामुळे चालकांची पार्श्वभूमी, त्यांचे वर्तन, चारित्र्य याविषयी फारसे गांभीर्य त्याकाळात कंपन्यांकडूनही दाखवले गेले नाही. ही घटना घडल्यानंतर मात्र चालकांचे रेकॉर्ड ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार झाला. पोलिसांनी सर्व एजन्सी आणि खासगी चालकांना त्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक केली. गेल्या काही वर्षात केवळ आयटीच नव्हे तर सार्वजनिक वाहतुकीसाठीही कॅबचा वापर सुरु झाला आहे. यावरील चालकांची चारीत्र्य पडताळणी होते. त्यांच्यावर कोणकोणते गुन्हे दाखल आहेत याची माहिती घेतली जाते. त्यासाठी संबंधिताला पोलीस आयुक्तालयामध्ये अर्ज करावा लागतो. नाममात्र शुल्क भरुन त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. सुरक्षारक्षक तसेच खासगी क्षेत्रातील व्यक्तींसाठी ही पडताळणी बंधनकारक आहे.