शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून गळा दाबून पत्नीची केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 20:19 IST

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रजमध्ये घडली.

पुणे, दि. 27 - चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रजमध्ये घडली. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाल्याने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. पती फरार असून, त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ॠतुजा दीपक जाधव ( वय 18 रा. शारदा भवन संतोषनगर कात्रज) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. दीपक जाधव असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. माया गोळे ( वय 38 रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि ऋतुजा यांचा २३ मे २०१७ ला विवाह झाला होता. विवाहानंतर १५ दिवसानंतर दीपकने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. तो छोट्या छोट्या कारणावरून तिला मारहाण करत होता. हे ऋतुजाच्या कुटुंबियांना कळल्यानंतर  त्यांनी दीपकला समजावले देखील होते. मात्र तरी देखील त्याचा पत्नीवरील अत्याचार सुरुच होता. नागपंचमीच्या सणाला घरी घेऊन जाण्यासाठी बुधवारी ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दीपकला फोन केला. पण त्याने  फोनच उचलला नाही. त्यानंतर ही मंडळी थेट मुलीच्या सासरी पोहोचली. पण त्यांना घराला कुलूप दिसले. यावेळी दीपक हा हडपसरमध्ये मद्यपान करत बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचा शोध घेऊन त्यांनी त्याच्याकडे ऋतुजा कोठे आहे? याची विचारपूस केली. यावेळी नशेत असलेल्या दीपकने पत्नीला मारल्याचे सांगितले. दीपकच्या या उत्तराने ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींना धक्काच बसला. घाबरलेल्या अवस्थेतून सावरत त्यांनी पुन्हा कात्रजच्या घरी धाव घेतली. त्यानंतर दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी त्यांना आपली मुलगी मृत अवस्थेत आढळली. दीपकने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची तक्रार ऋतुजाच्या माहेरच्या मंडळींनी दिली असून खुनी पती फरार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.