शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील जखमींना आणण्याचा ‘धंदा’च

By admin | Updated: December 5, 2014 05:11 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील रूग्णालयांची तर ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशीच अवस्था झाली आहे.

मंगेश पांडे, पिंपरीरुग्णावर उपचार करून त्यांना जीवदान देणारे ठिकाण या दृष्टीने रूग्णालयाकडे पाहिले जाते. मात्र, वैद्यकीय उपचार खर्चाच्या नावाखाली रूग्णालय व्यवस्थापनाकडून होत असलेल्या आर्थिक लुटीमुळे रूग्णालये बदनामी होऊ लागली आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील रूग्णालयांची तर ‘नाव मोठे लक्षण खोटे’ अशीच अवस्था झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका रूग्णालयांशिवाय सुमारे चारशे रूग्णालये, क्लिनिक आहेत. पाचशे पेक्षा जास्त बेडची सुविधा असलेली दोन मोठी खासगी रूग्णालये आहेत. तर शंभर ते दोनशे बेडची सुविधा असलेली पाच खासगी रूग्णालये आहेत. या रूग्णालयांच्या स्वत:च्याच रूग्णवाहिकादेखील आहेत. शहरातील विविध भागांसह पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गांवर या रूग्णवाहिका उभ्या असतात. अपघातातील जखमींना रूग्णालयात पोहचविण्यासाठी या रूग्णवाहिकांची मदत होते. मात्र, भरमसाठ उपचार खर्चामुळे शहरातील रूग्णालये बदनाम होत आहेत. रूग्णालयातील सुविधांबाबत वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्धी केली जाते. प्रत्येक विभागात कशा पद्धतीने उत्तम सेवा उपलब्ध आहे याबाबतचे फलक शहरात ठिकठिकाणी पहायला मिळतात. आपलेच रूग्णालय कसे दर्जेदार आहे हे दाखविण्याची जणू स्पर्धाच असते. आपल्या रूग्णालयात नामवंत डॉक्टरांकडून सेवा दिली जाते. हे माहित व्हावे यासाठी रूग्णालयात प्रवेश करताच डॉक्टरांची मोठी यादी पहायला मिळते. रूग्णाला रूग्णालयात दाखल केल्यानंतर लगेचच त्याचे बील सुरू होते. वेगवेगळ्या तपासण्या करायला सांगितले जाते.